Friday, April 26, 2024
Homeनगररुग्ण सापडणार्‍या गावात आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण

रुग्ण सापडणार्‍या गावात आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील (Ahmednagar District) काही तालुक्यात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. (corona patients is increasing again) त्यामुळे रुग्ण संख्या आढळून आलेल्या गावांमध्ये तातडीने आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण (Surveys by health teams) करुन लक्षणे आढळणार्‍या रुग्णांची चाचणी करा, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित (Resident Deputy Collector Sandeep Nichit) यांनी दिले.

- Advertisement -

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या (Possible third wave of corona) अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात तालुकास्तरावरुन कऱण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा (Review of measures) निवासी उपजिल्हाधिकारी निचित यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले (Deputy Collector Dr. Ajit Thorbole), पल्लवी निर्मळ, रोहिणी नर्‍हे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखऱणा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.

यावेळी निचित म्हणाले, ज्या भागात रुग्ण संख्या वाढत आहे, त्याठिकाणी संबंधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची आरटीपीसीआर चाचण्या (RTPCR Testing) कऱणे, जास्त रुग्णसंख्या आढळून येत असलेला परिसर प्रतिबंधित करणे, लक्षणे आढळून येत असलेल्या व्यक्तींच्या चाचण्या कऱणे आणि कोविड सुसंगत वर्तणूकीची काटेकोर अंमलबजावणी (Strict implementation of covid consistent behavior) करणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी कार्यवाही करावी. तालुकास्तरीय यंत्रणांनी समन्वय राखून करोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठीच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे.

कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. तालुका यंत्रणांकडून याबाबत ज्या गतीने कार्यवाही आवश्यक आहे, तशी होताना दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्‍यांवर कडक कार्यवाही (Strict action against those who walk in public places without masks) आवश्यक आहे. सध्या ज्या भागात अशा कारवाया कमी झालेल्या दिसत आहेत. तेथेच रुग्णसंख्या वाढतानाचे चित्र आहे. त्यामुळे याबाबत सर्व यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या