Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शस्त्रक्रियेचा सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शस्त्रक्रियेचा सल्ला

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

मानदुखीच्या त्रासाने त्रस्त असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray येथील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून Admited in Reliance’s Harkishandas Hospital गुरूवारी रुग्णालयातील विविध डॉक्टरांनी ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

- Advertisement -

तसेच आज काही चाचण्याही करण्यात आल्या असून या चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर डॉक्टरांच्या मतानुसार आवश्यक असलेली एक छोटी शस्त्रक्रिया Minor surgery त्यांना सूचविण्यात येणार आहे. मात्र ही शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय ठाकरे कुटूबियांशी चर्चा करून घेतल्यानंतरच संबंधित डॉक्टरांना पुढील शस्त्रक्रियेसाठी हिरवा कंदिल मिळणार असल्याचे समजते.

उद्धव ठाकरे बुधवारी रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात दाखल झाले. संध्याकाळी त्यांच्यावर कोणत्याही चाचण्या करण्यात आल्या नाहीत. मात्र आज डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांचे अहवाल आज रात्रीपर्यंत अपेक्षित असून अहवाल आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांनी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात सल्ला दिला होता. मात्र याचा निर्णय विविध चाचण्या केल्यानंतर घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी डॉक्टारांना सांगितल्याचे कळते.

त्यानुसार आज चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर मुख्यमंत्री डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहेत. डॉक्टरांच्या चर्चेनंतर ठाकरे कुटूंबामध्ये चर्चा होऊन मग शस्त्रक्रियेसंदर्भातील निर्णय होणार असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणी संदर्भात रिलायन्स रुग्णालय कोणतेही मेडिकल बुलेटीन प्रसिद्ध करणार नसून उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भातील अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच देण्यात येणार असल्याचे समजते.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांना मुंबईतल्या रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपचार करत असून लवकरच ते बरे होतील. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सेवेत रूजू होतील. फार चिंता करावी असे नाही. मानेचे थोडेफार दुखणे असून त्यावर उपचार होऊन दोन तीन दिवसात ते घरी परततील, असेही राऊत यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या