Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआधार, सुरक्षा देणारा नगरसेवक हवा

आधार, सुरक्षा देणारा नगरसेवक हवा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) आगामी निवडणुकीत (election) प्रभागात नगरसेवक (Corporator) म्हणून निवडून येईल त्यांनी प्रभागातील मूलभूत समस्यांबरोबर प्रभागातील आरोग्याच्या (health) समस्याकडे विशेष लक्ष द्यावे. करोनामुळे मोठ्या प्रमाणात नोकर्‍या गेल्या आहेत, रोजगार (Employment) देखील कमी झाला आहे.

- Advertisement -

नवीन पिढी देखील शिक्षण (education) घेऊन नोकरीच्या शोधात निघाली आहे. अशा वातावरणात नगरसेवकांनी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. बेरोजगारी नियंत्रणात आणण्यासाठी उपाय योजना कराव्यात, जुने नाशिक (old nashik) भागात विशेष योजना आणून विकास करण्यात यावा, बागवानपुरा या ठिकाणी ओपीडी सुरू व्हावी. नगरसेवक स्थानिक असल्यास नागरिक संपर्कात असतात.

– रफिक शेख

ज्या उमेदवाराचा चांगला जनसंपर्क असेल त्याला नागरिकांनी निवडून द्यायला पाहिजे. तो स्थानिक असायला पाहिजे. बाहेरील उमेदवार येऊन प्रभागात निवडून जातात, मात्र पाच वर्षे ते दिसत नाही. यामुळे विकास कामे (Development works) ठप्प होतात. नागरिक आपले प्रश्न कुठे मांडणार हा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे जुने नाशिक (old nashik) भागात देखील स्मार्ट सिटी (Smart City) तयार व्हावी, जुने नाशिक भागातील आरोग्याचा प्रश्न सुटावा, नियमित स्वच्छता व्हावी, घंटागाडी वेळेवर यावी, डेंगूसारखे (Dengue) आजार नेहमी पसरतात त्यांना आळा बसवण्यात यावा, हे सर्व कामे आपल्या जोरावर करणारा नगरसेवक पाहिजे.

– एजाज शेख

सर्व जाती धर्माच्या, पंथांच्या लोकांना बरोबर घेऊन पुढे जाणारा नगरसेवक (Corporator) हवा. शिक्षित, अभ्यासू तसेच राजकीय वजन असलेला व्यक्ती नगरसेवक म्हणून निवडून आल्यास तो प्रभागातील सर्व प्रकारची कामे मार्गी लावू शकतो. यामध्ये सर्व प्रकारच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता असायला पाहिजे. महासभा असो की स्थायी समिती सभा त्याप्रमाणे इतर कोणत्याही प्रकारच्या सभागृहात बोलणारा व्यक्ती नगरसेवक (Corporator) म्हणून प्रभागाला मिळायला पाहिजे, यामुळे प्रभागातील समस्यांना वाचा फुटते व प्रभागातील समस्या वेळीच निरसन होतात.

– रफिक सय्यद

प्रभागात मूलभूत समस्या जसे पाणी, लाईट, गटारी, धूरफवारणी अशा बारीक-सारीक कामांकडे विशेष लक्ष देणारा नगरसेवक हवा. त्याचप्रमाणे महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी नगरसेवकाने प्रयत्न करायला हवे, महापालिकेच्या शाळांमध्ये चांगल्या सुविधा मिळाल्या तर मुलांची संख्या वाढेल तसेच दर्जेदार शिक्षण मिळाले तर मुलांचे भविष्य उज्वल होईल. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा नगरसेवक असावा. सर्व प्रकारच्या सुविधा मिळवून देणारा सक्षम नगरसेवक प्रभागाला मिळाल्यास नागरिकांना चिंता कमी होते.

– रिझवान शेख

- Advertisment -

ताज्या बातम्या