Wednesday, April 24, 2024
Homeनगरपुरवठा विभागातील सुतळीत होणार्‍या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

पुरवठा विभागातील सुतळीत होणार्‍या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

जिल्ह्यातील शासकीय गोदामांना पुरविल्या जाणार्‍या सुतळीत मोठा गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे यांनी केली आहे.

- Advertisement -

जिल्हा पुरवठा अधिकार्‍याकडून जिल्ह्यातील सर्व शासकीय गोदामांना सुतळी पुरविली जाते. मात्र कोणत्याही शासकीय गोदामाला जिल्हा पुरवठा विभागाकडून सुतळी पुरविण्यात आलेली नाही. कागदोपत्री सुतळी पुरविल्याचे दाखवून बिले काढली जातात. याबाबत अनेकवेळा जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना निवेदने देण्यात आली, पण आमच्या निवेदनांना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. त्यामुळे सुतळी गैरव्यवहाराची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा हिंदू एकता आंदोलन पक्ष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा श्री. शितोळे यांंनी दिला आहे.

अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जावून निवेदन देण्यात आले. त्याप्रसंगी श्रीरामपूर शहरप्रमुख मंगेश छतवाणी, जिल्हाध्यक्ष मनोहर बागुल, प्रदेश संघटक विजय जगताप, कार्याध्यक्ष चिलिया तुवर, शिवाजी फोफसे, प्रसाद गाढे, प्रसिद्धीप्रमुख अमिरभाई जहागिरदार, जिल्हा सरचिटणीस वसंत गायकवाड, अविनाश कणगरे, राजेंद्र जाधव, दत्तात्रय मंडलिक, राजेंद्र सूर्यवंशी, रामभाऊ गांगुर्डे, बाबासाहेब कदम, शिवाजी फोफसे, प्रकाश गायकवाड, सोमनाथ जगताप, गुरु भुसाळ, रामदास सदाफळ, बाबासाहेब कदम आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या