Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकसमर विशेष: वाढता उन्हाळा; तब्येत सांभाळा

समर विशेष: वाढता उन्हाळा; तब्येत सांभाळा

नाशिक | Nashik

शहरातील तापमानात (Temperature) सध्या प्रचंड वाढ झाली आहे. उन्हाची तीव्रता इतकी वाढली आहे की सकाळी नऊ वाजल्यानंतर घरातून बाहेर पाय काढवत नाही. कडक उन्हामुळे (summer) नागरिकांना घराबाहेर पडणे देखील अवघड झाले आहे. घरात देखील वातावरण उष्णच असते.

- Advertisement -

उष्णतेपासून संरक्षण व्हावे यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आपसूकच फॅन (fan), कूलर (cooler) किंवा एसी (AC) असे पर्याय अनेकांकडून वापरले जात आहेत. त्यामुळे बाजारात फ्रीज (Freeze), एसी आणि कूलरला मागणी वाढली आहे. नागरिकांची पाऊले इलेक्ट्रॉनिक्स दुकानाकडे (Electronics shop) वळत आहे. बाजारात बजेट प्रमाणे अनेक चांगले एसी व कूलर उपलब्ध आहेत. दुकानदार देखील विक्रीसाठी कंबर कसून विविध ऑफर्सद्वारे (offers) नागरिकांना आकर्षित करत आहेत.

उन्हापासून संरक्षण (Sun protection) करण्यासाठी टोप्यांचा वापरही वाढू लागल्याने टोपी विक्रेत्यांकडेही गर्दी वाढू लागली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घरातून बाहेर पडताना काही गोष्टी सोबत असणे गरजेचे असते. त्यातील सगळ्यात खास वस्तू असते ती म्हणजे सनग्लासेस. सनग्लासेस फक्त स्टाईलसाठीच नव्हे तर डोळ्यांचे सूर्यकिरणापासून संरक्षण करण्यात उपयुक्त ठरतो. याशिवाय कचरा किंवा किटकांपासूनही डोळ्यांना संरक्षण मिळते. अनेक जण विशेषतः तरुणाई दर्जासह त्याच्या लूकलाही महत्त्व देतात.

दरम्यान, शहरात थंड पेयाची दुकाने (Cold drink shops) सजली आहेत. या ठिकाणी विविध फळांचा ज्यूस (Juice), थंडपेय, आईस्क्रीम (Ice cream) यांना मागणी वाढली आहे. मुख्य बाजारपेठेबरोबरच अनेक प्रमुख मार्गावरून शहाळे विक्रेत्यांची गर्दी वाढू लागली आहे. अनेक प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा फिरत्या रसवंतीगृहाच्या गाड्याही वाढू लागल्या आहेत. या व्यवसायात स्थानिकांबरोबरच अनेक जण शहराबाहेरून देखील येथे आले आहे. उसाचा रस प्रति ग्लास 10 ते 30 रुपये आहे. ज्यूस केंद्रांवरही गर्दी वाढू लागली आहे. फळांना मागणी वाढत असून दरातही वाढ सुरु आहे.

उन्हात डिहायड्रेशनची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते. या हंगामात आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्वाचे होते. हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय नागरिक अनेक प्रकारच्या थंड पदार्थांचा आहारात समावेश करत आहेत. अनेक जण घरगुती पेये व पदार्थांना पसंती देत आहेत शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी कैरीच्या पन्ह्याचा वापर करण्यात येत आहे. यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा वाढण्यास मदत होते. शिवाय कैरीच्या पन्ह्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दररोज ताक आणि कोकम सरबतचा देखील वापर वाढला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या