Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशVISUAL STORY : राज्यभरात उन्हाच्या झळा तीव्र; घराबाहेर पडताना कशी घ्याल काळजी?...

VISUAL STORY : राज्यभरात उन्हाच्या झळा तीव्र; घराबाहेर पडताना कशी घ्याल काळजी? जाणून घ्या

हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज (IMD) खरा ठरत असून गेल्या दोन दिवसा पासून राज्यभरात उष्णतेची लाट आली असून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन अनेक भागात पारा 40 अंश सेल्सियस पर्यंत गेला आहे.

येत्या काही दिवसांमध्ये तापमानात झपाट्याने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी जाणीवपूर्वक काही बाबींचे पालन करण्याचा सल्ला वैद्यकीयतज्ज्ञांनी दिला आहे. तापमान वाढल्यामुळे थकवा येऊ शकतो.

- Advertisement -

एखाद्या व्यक्‍तीच्या शरीराचे तापमान वेगाने वाढल्यास उष्माघाताचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे वैद्यकीय खबरदारी घेण्याचे निर्देश तज्ज्ञांनी दिले आहेत. तसेच या दिवसात घरा बाहेर पडताना ही खास काळजी घ्यावी, जेणेकरून तुम्हाला उष्मघाताचा त्रास होणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात थेट सूर्याच्या किरणाच्या संपर्कात येण टाळावे. तसेच नागरिकांनी उन्हात जास्त न फिरता आपल्या शरीराच तापमान कसे थंड राहणार याची काळजी घ्यावी. उन्हापासून बचाव करण्यासाठी शरीरातील पाण्याचा प्रमाण संतुलित ठेवावे. दिवसभरात भरपूर पाण्याचे सेवन करावे. तसेच शरीर डिहायड्रेट होणार नाही याची काळजी घ्यावी.

कडक उन्हाळयात बाहेर जाताना आवर्जून डोके झाकणे. त्यासोबतच गॉगल देखील लावा याने डोळ्यांना सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होईल. उन्हाळ्यात चहा, कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक्स घेणे टाळावे. घाम शोषुन घेतील असे कपडे वापरणे. हलक्या रंगाचे सुती कपडे वापरावे.

घराबाहेर जाताना तुमच्या जवळ ग्लुकॉन डी किंवा इलेक्ट्रॉल पावडर बाळगा. वातावरणातील उष्णतेमुळे अन्न लवकर नासत/ आंबत यामुळे तुम्ही ऑफिसला किंवा शाळा, कामाच्या ठिकाणी डबा खातांना भाजी चांगली आहे ना याची खात्री करून खाणे.

एसीमध्ये काम करणार्‍यांनी एसीतून बाहेर आल्यावर एकदम उकाड्याने गरगरल्यासारखे होते. त्यामुळे एसीतून बाहेर आल्यावर काही वेळ एखाद्या जागेवर बसून घ्या. तसेच उन्हातुन आल्यावर लगेच कुलर अथवा एसी मध्ये जाऊन बसु नये.

उन्हाळ्यात बाहेर गेल्यावर चहाचे प्रमाण कमी करून कोकम, लिंबू, पन्हे अश्या सरबतांचे सेवन वाढवणे. नारळपाणी व ताक यांचे नियमित सेवन करणे.

- Advertisment -

ताज्या बातम्या