Saturday, April 27, 2024
Homeनगरआत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या आरोपीवर गुन्हा

आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या आरोपीवर गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा न्यायालय आवारात स्वत: च्या हातावर धारदार हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या आरोपीविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली होती. कल्याण नारायण भिस्ते (रा. नवनागापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अंमलदार अनिल आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. भिस्ते याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो पसार होता. त्याच्याविरूध्द न्यायालयाने अटक वॉरंट काढले होते. एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक करून बुधवारी दुपारनंतर न्यायालयात हजर केले होते.

न्यायालय आवारात त्याने स्वत:च्या हातावर धारदार हत्याराने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अधिक तपास पोलीस हवालदार जी.जी.गोर्डे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या