Tuesday, April 23, 2024
Homeनगरउसाला पहिली उचल 2500 रुपये मिळावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

उसाला पहिली उचल 2500 रुपये मिळावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

एकरुखे |वार्ताहर| Ekrukhe

राहाता तालुक्यातील गणेशनगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पा. सहकारी साखर कारखाना श्री. गणेश युनिट-2 गणेशनगर कार्यक्षेत्रातील ऊस तोडणीबाबत व उसाला पहिली उचल 2500 रुपये मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. अन्यथा ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्यावतीने आपल्याला कारखान्यावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

- Advertisement -

यावर्षी कार्यक्षेत्रात नोव्हेंबर डिसेबर या महिन्यात मोठ्या प्रमाणात लागवड असल्याने ऊस तोड वेळेवर होत नसल्याने ऊस उत्पादकांचे नुकसान होत आहे . परिसरामध्ये हुमनी तसेच उसाला तुरे येत आहेत. आपल्या शेतकरी विभागाकडून लेबर कमी असल्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस तोडणीस विलंब होत असल्याने आपण कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोड बंद करून परिसरातील ऊस तोडावा तसेच इतर कारखान्याप्रमाणे उसाला पहिली उच्चल 2500 रुपये प्रमाणे द्यावी अन्यथा ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्यावतीने कारखान्यावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या