Friday, April 26, 2024
Homeनाशिकअरेरे! सलग दुसऱ्या वर्षी ऊसाचे तेच क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी

अरेरे! सलग दुसऱ्या वर्षी ऊसाचे तेच क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी

शेनित | वार्ताहर Shenit

इगतपुरी तालुक्यातील धामणगांव (Dhamangaon Tal Igatpuri) येथील परशुराम रमेश गाढवे (Parashuram Gadhave) यांच्या शेतात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे काल (दि १८) दुपारी साडेतीनच्या सुमारास गट नंबर ६३२ व ३३ मध्ये दोन एकर ऊस पूर्णतः जळून राख झाला. सलग दुसऱ्या वर्षी हे ऊसाचे क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे शेतकऱ्यावर आभाळ कोसळले आहे….(sugarcane fire)

- Advertisement -

याच पिकावर वर्ष भराचा घर खर्च, वीजपंपाचे लाईट बिल (light bill), शिक्षण, शेतीला लागणारी खते, बी बियाणे, रोपे यांची उसनवारी यातून येणाऱ्या पैसातुनच कसे बसे ,तडजोड करत प्रवास सुरू होता.

परंतु तो ऊस आता जळून खाक झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विद्युत कंपनीने (MSEB) या जळीत उसाची नुकसान भरपाई देवून कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

मागील वर्षी देखील त्याच ऊस क्षेत्राचे शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झाले होते. याहीवर्षी ऊस जळाल्याने परशुराम गाढवे यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

दुपारच्या भर उन्हात ऊस पेटल्याने जवळच त्यांचे राहते घर व जनावरांचा गोठा असल्याने गोठ्यातील जनावरे रस्त्याकडे हाकलले. तसेच घरातील ज्वलनशील गॅस सिलेंडर व बराचसा प्रपंच त्यांनी बाजूला केल्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला.

याबाबत साकुर सबस्टेशनचे धोरणकर यांना संपर्क साधला असता त्यांनी त्वरित जागेवर येऊन पंचनामा केला व पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

शेतात उभे असलेला ऊस कुठलाच कारखाना तोडत नसल्याने १ टन ला तेराशे रुपये मातीमोल भावाने दिला. त्यातच अशी अवकळा कोसळल्याने हातचा घास हिरावून नेला. परंतु, आम्हाला अपेक्षा आहे ती सलग दोन वर्ष शॉकसर्किटमुळे ऊस जळाला. त्यामुळे वीज मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

परशुराम गाढवे, धामणगांव

- Advertisment -

ताज्या बातम्या