Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसाखर कारखाना बंद, उसाचा वापर जनावरांसाठी

साखर कारखाना बंद, उसाचा वापर जनावरांसाठी

देवळाली कॅम्प । Deolali Camp

नाशिक सहकारी साखर कारखाना (Nashik Shugar Factory) गेल्या आठ वर्षापासून बंद असल्याने मेटाकुटीला आलेल्या ऊस उत्पादकांनी (Sugarcane growers) अखेर उसाचा वापर चाऱ्यासाठी (fodder) करण्याचा निर्णय घेत सायगाव उसाची लागवड (Sugarcane Sowing) सुरु केली आहे. वर्षातून दोनदा तोडणी होत असल्याने उत्पादनाचा नवा स्रोत शोधला आहे.

- Advertisement -

नाशिक (Nashik), सिन्नर (sinnar), इगतपुरी (Igatpuri) व त्रंबकेश्वर अशा चार तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना आर्थिक विवंचनेमुळे सन 2013- 14 पासून बंद पडल्याने दारणा काठच्या (Darna River) ऊस उत्पादकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. भाजीपाल्याला भाव (Vegetable Price) मिळत नाही. मजुरीचे वाढलेले दर यामुळे ऊस पिका शिवाय पर्यायच राहिला नाही.

अशातच पिकवलेला उस गळीतासाठी कुठे पाठवायचा हा प्रश्न उभा राहिल्याने शेवगे दारणा, नानेगाव येथील शेतकऱ्यांनी वर्षातून दोन वेळा तोडणीस येणाऱ्या सायगाव उसाची लागवड सुरू करून चाऱ्यासाठी वापरण्याचा निर्णय घेताना त्यातून आर्थिकही मदत मिळेल असे नियोजन केले आहे. सहा महिन्यात चाऱ्यासाठी परिपक्व होणाऱ्या या पिकापासून एकरी 50 ते 60 मेट्रिक टन उत्पन्न मिळत आहे.

दोन वर्षांपूर्वी 2500/- रुपये मेट्रिक टनाने चाऱ्यासाठी जाणारा ऊस आता चौदाशे ते पंधराशे रुपये दराने विक्री होत आहे. त्यातच पावसाचे प्रमाण वाढल्याने हिरवा चारा मुबलक उपलब्ध होत असून उसाच्या चाऱ्याला प्रतिसाद कमी मिळू लागला आहे.

अशा परिस्थितीत उसाच्या चाऱ्याची शेतीची जोपासना करण्याकडे येथील शेतकऱ्यांचा कल वाढू लागला. असला तरी चाऱ्याच्या पिकाला मर्यादा असल्याने लवकरात लवकर कारखाना सुरू होणेची गरज निर्माण झाली आहे. तसे झाल्यास पुन्हा साखर निर्मितीसाठी उसाची लागवड करण्याचा शेतकऱ्यांचा मनोदय आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या