Friday, April 26, 2024
Homeनगरमुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर

मुळा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर

सोनई (वार्ताहर) – सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 16 एप्रिल रोजी होत असूनआज सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. प्रशासनाच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मुळा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

सोनई, घोडेगाव व खरवंडी या तीन गटांतून प्रत्येकी दोन तर करजगाव, नेवासा व प्रवरासंगम या तीन गटांतून प्रत्येकी तीन अशा कारखान्याच्या एकूण 6 गटातून 15 संचालक निवडून दिले जाणार आहेत. त्याचबरोबर उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था सभासद यामधून एक आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी यामधून एक, महिला प्रतिनिधी दोन तसेच इतर मागासवर्गीय संचालक एक व विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग यामधून एक असे सर्व मिळून एकूण 21 संचालक निवडून द्यावयाचे आहेत.

- Advertisement -

आज सोमवार दि. 16 मार्चपासून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. शुक्रवार 20 मार्चपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) दाखल करता येतील. त्या त्या दिवशी आलेल्या अर्जांची प्रसिद्धी त्याच दिवशी दुपारी 4 नंतर तहसील कार्यालय येथेच करण्यात येईल. सर्व प्राप्त अर्जांची छाननी करण्यास 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात करण्यात येईल.

24 मार्च रोजी सकाळी 11 वाजता विधिग्राह्य नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशपत्र 24 मार्च ते 7 एप्रिल पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत मागे घेता येतील. 8 एप्रिल रोजी निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी व निशाणी वाटप सकाळी 11 वाजता करण्यात येईल. आवश्यकता असेल तर 16 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान घेण्यात येईल. शुक्रवार दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात करून मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाईल.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा अहमदनगरचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) बाजीराव शिंदे आणि राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांच्या सहीने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

निवडून जाणारे 21 संचालक
निवडून जाणारे 21 संचालक गट- सोनई-2, घोडेगाव-2, खरवंडी-2, करजगाव-3, नेवासा-3, प्रवरासंगम-3.
उत्पादक, बिगरउत्पादक व पणन संस्था-1, अनुसूचित जाती-जमाती-1, महिला प्रतिनिधी-2, इतर मागासवर्गीय-1, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी-1

- Advertisment -

ताज्या बातम्या