ऊस गाळपात जिल्ह्यातील ‘अंबालिका’ दुसर्‍या तर ‘ज्ञानेश्वर’ राज्यात चौथ्या स्थानावर

jalgaon-digital
2 Min Read

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

राज्यातील यंदाचा 2020-21 चा गाळप हंगाम 208 दिवस चालला असून 190 साखर कारखान्यानी एकूण 1012 लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण करून 106.3 लाख टन साखर उत्पादीत केली आहे. राज्यातील ऊस गाळपात नगर जिल्ह्यातील अंबालिका (16.08 लाख टन) दुसर्‍या क्रमांकावर, भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना (14.50 लाख टन) चौथ्या, संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना (13.03 लाख टन) सहाव्या, सोनई येथील मुळा सहकारी साखर कारखाना (12.58 लाख टन) नवव्या क्रमांकावर तर शेवगाव येथील गंगामाई इंडस्ट्रीज लि. (12.55 लाख टन) दहाव्या क्रमांकावर आहे.

राज्यातील 190 साखर कारखान्यांनी यंदा सरासरी 140 दिवस गाळप करून 106 लाख टन साखर तयार केली. इथेनॉल निर्मितीमध्येही राज्य आघाडीवर असून केंद्र सरकारचे 108 कोटी लिटरचे ऊद्दीष्ट कारखान्यांनी पूर्ण केले आहे. एकूण 93 टक्के एफआरपी दिली गेली. 19 कारखान्यांवर सुमारे 450 कोटी रूपयांची थकबाकी दिली नाही म्हणून जप्तीची कारवाई झाली . आणखी 10 कारखान्यांवर कारवाई प्रस्तावित आहे.12 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता. सर्व ऊस गाळपात आणला गेला .

हंगाम 2020-21 मध्ये उच्चतम गाळप केलेले 10 साखर कारखाने-

1) जवाहर (हातकंणगले) 18.88 लाख टन 2) अंबालिका, कर्जत अहमदनगर 16.08 लाख टन 3) सोलापूर विठ्ठलराव शिंदे ता. माढा 15.02 लाख टन 4) लोकनेते घुले पाटील ज्ञानेश्वर भेंडे बु, ता. नेवासा 14.50 लाख टन 5) जरंडेश्वर, कोरेगाव 14.38 लाख टन 6) सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, संगमनेर 13.03 लाख टन 7) बारामती ता.इंदापूर 12.76 लाख टन 8) माळेगांव ता. बारामती 12.68 लाख टन 9) मुळा, सोनई 12.58 लाख टन 10) गंगामाई नजीक बाभुळगाव ता. शेवगाव 12.55 लाख टन.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *