Thursday, April 25, 2024
Homeजळगावमिस्क आजारावर यशस्वी उपचार

मिस्क आजारावर यशस्वी उपचार

जळगाव : Jalgaon

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात Government Medical College and Hospital मृत्यूच्या दाढेतून ११ वर्षीय बालकाला वाचविण्यात अतिदक्षता आणि बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाला यश आले आहे. कोरोनाविरहित रुग्णांसाठी रुग्णालय खुले झाल्यानंतर दाखल होणारा या पहिल्या रुग्णास गुरुवार दि. ५ ऑगस्ट रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद Dr. Jaiprakash Ramanand यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

- Advertisement -

अतिदक्षता विभागात मरणाशी झुंज देऊन स्वतःच्या पायावर चालत हा ११ वर्षीय मुलगा यशस्वी उपचार मिळाल्याने घरी गेला आहे.

मोहन सुरेश गोपाळ (वय ११ वर्षे) रा. वावडदा ता. जळगाव याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तसेच खाजगी दवाखान्यात उपचार होत नसल्याने २२ जुलै रोजी पहाटे ४. ३० वाजता दाखल झाला होता. याच दिवशी रुग्णालय देखील कोरोनाविरहित उपचारांसाठी घोषित झाले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आल्यानंतर त्याला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्याचा ऑक्सिजन ६५ ते ७५ असा होता. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी विविध तपासणी केली. त्यात त्याला मिस-सी (मिस्क) हा आजार व सोबत न्यूमोनिया असल्याचे निदान झाले.

मोहनला सलग ५ दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्यानंतर त्याची प्रकृती पूर्वपदावर आलीजळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यूच्या दाढेतून ११ वर्षीय बालकाला वाचविण्यात अतिदक्षता आणि बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाला यश आले आहे. कोरोनाविरहित रुग्णांसाठी रुग्णालय खुले झाल्यानंतर दाखल होणारा या पहिल्या रुग्णास गुरुवार दि. ५ ऑगस्ट रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद Dr. Jaiprakash Ramanandयांच्या उपस्थितीत रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

अतिदक्षता विभागात मरणाशी झुंज देऊन स्वतःच्या पायावर चालत हा ११ वर्षीय मुलगा यशस्वी उपचार मिळाल्याने घरी गेला आहे. मोहन सुरेश गोपाळ (वय ११ वर्षे) रा. वावडदा ता. जळगाव याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तसेच खाजगी दवाखान्यात उपचार होत नसल्याने २२ जुलै रोजी पहाटे ४. ३० वाजता दाखल झाला होता. याच दिवशी रुग्णालय देखील कोरोनाविरहित उपचारांसाठी घोषित झाले होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आल्यानंतर त्याला तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्याचा ऑक्सिजन ६५ ते ७५ असा होता. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांनी विविध तपासणी केली.

त्यात त्याला मिस-सी (मिस्क) Miss-C हा आजार व सोबत न्यूमोनिया neumonia असल्याचे निदान झाले. मोहनला सलग ५ दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्यानंतर त्याची प्रकृती पूर्वपदावर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या