Saturday, April 27, 2024
Homeनंदुरबारहयातीचे प्रमाणपत्र सादर करा अन्यथा 1 जुलैपासून अर्थसहाय्य बंद : महसूल प्रशासन

हयातीचे प्रमाणपत्र सादर करा अन्यथा 1 जुलैपासून अर्थसहाय्य बंद : महसूल प्रशासन

मोदलपाडा,Modalpada ता.तळोदा । वार्ताहर

तळोदा येथील संजय गांधी निराधार योजनेतील (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभार्थ्यांनी (Beneficiaries) आपले हयात असल्याचे प्रमाणपत्र (Certificate of survival) पोस्ट आफिस व सबंधित बँकेकडे जमा (Deposit to bank) करण्याचा अल्टिमेटम जून महिन्याच्या अखेरपर्यंत देण्यात आला आहे, अन्यथा 1 जुलै पासून अर्थसहाय्य बंद (Financing off) करण्याचा इशारा तळोदा महसूल प्रशासनाने (Taloda Revenue Administration) दिला आहे.

- Advertisement -

दारिद्र्य रेषेखालील सर्वच घटकातील निराधार व्यक्तींना (destitute) दरमहा अर्थसहाय्य (Financial aid) देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ, श्रावण बाळ व विधवा पेन्शन अशा विविध वैयक्तिक लाभाच्या योजना (Personal benefit plans) गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहेत. या योजनेत लाभार्थ्यांना दरमहा 1 हजार रुपये अर्थसहाय्य (Financial aid) देण्यात येते. तथापि यातील लाभार्थ्यांच्या दुर्दैवाने मृत्यू झाला तरी त्याची माहिती लवकर मिळत नाही अशावेळी सदर लाभार्थीस शासनाचे अनुदान (Grants) सुरूच राहत असते. साहजिकच अनुदानाचा वितरणादेखील अडथळा निर्माण होत असतो.

या पार्श्वभूमीवर दरवर्षी शासनाने आर्थिक वर्षानंतर लाभार्थ्यांना आपले हयातीचे प्रमाणपत्र (Certificate of survival) सक्तीचे केले आहे. त्यानुसार तळोदा येथील महसूल प्रशासनाने प्रसिध्दीसाठी निवेदन दिले असून शासनाच्या संजय गांधी व राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेचा लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांना आवाहन केले असून त्यांनी आपले हयातीचे प्रमाण पत्र त्यांनी पोस्ट कार्यालय अथवा ज्या राष्ट्रीयकृत बँकांच्या (nationalized banks) शाखामार्फत योजनेच्या लाभ घेत आहेत तेथे प्रमाणपत्र जमा करावे. तशी दिनांकासह नोंद तेथील अधिकार्‍यांकडून घेवून आपल्या गावाच्या तलाठयाकडे द्यावी.

मे महिन्याचे अखेरपर्यंत असे प्रमाणपत्र महसूल प्रशासनाकडे (revenue administration) जमा करण्याचा अल्टिमेटम देण्यात आला असून अन्यथा जुलै महिन्यापासून अर्थसहाय्य बंद करण्याचा इशारादेखील देण्यात आहे.लाभार्थ्यांनी आपल्या हयातीचा व उत्पन्नाचा दाखला सादर करण्याचा आदेश शासनाच्याच असल्याने लवकरात लवकर जमा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. असे असले तरी लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या तलाठ्यांना सक्त सूचना द्यावी. कारण त्यासाठी लाभार्थ्यांना त्यांच्याकडे सतत फिरफीर करावी लागत असल्याची लाभार्थ्यांची व्यथा आहे.

तळोदा तालुक्यात साडे अकरा हजार लाभार्थी

राज्य व केंद्र सरकारच्या या योजनेच्या संयुक्त अनुदानातून दिल्या जाणार्‍या अर्थ सहाय्यचा तळोदा तालुक्यात अशा 11 हजार 528 लाभार्थ्याना लाभ दिला जात आहे. यात वृध्दापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांचा अधिक समावेश आहे. यासाठी शासनाकडून दरमहा 1 कोटी 15 लाख 28 हजार रुपयांचे अर्थ सहाय्य सदर लाभार्थ्यांना दिले जात असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या