Saturday, April 27, 2024
Homeजळगावपत्रकारिता पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेतील पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा बहि:स्थ माध्यम अभ्यासदौरा छ. संभाजीनगर (औरंगाबाद) येथे नुकताच पार पडला. यात विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय संचालक कार्यालय, भास्कर समूहाचे माय एफएम रेडिओ स्टेशन आणि दै.लोकमत कार्यालयाला भेट देवून येथील माहिती जाणून घेतली.

- Advertisement -

माध्यमशास्त्र प्रशाळेच्या पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सुरूवातीला छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाला भेट दिली. या विभागातील रेडिओ, टी.व्ही स्टुडिओ या विषयी माहिती जाणून घेतली. विभागप्रमुख डॉ.दिनकर माने, प्रा.संजीव साळवे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयातील वस्तूसंग्रहालयात भेट देवून बाबासाहेबांनी प्रत्यक्षात वापरलेल्या वस्तूंचे दर्शन घेतले. तसेच महाविद्यालयाविषयी माहिती जाणून घेतली. त्यानंतर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय विभागीय संचालक कार्यालयाला भेट देवून शासनाच्या जनसंपर्काविषयी सहायक संचालक गणेश फुंदे यांच्याकडून माहिती जाणून घेतली. दुपारच्या सत्रात भास्कर समूहाचे माय एफएम रेडिओ स्टेशनला भेट दिली.

येथील प्रोग्रामिंग हेड अक्षय कांबळे यांनी संहिता लेखन, कार्यक्रम निर्मिती, संपादन याबाबत तर आर.जे.रसिका यांनी कार्यक्रम निवदेनाबाबत माहिती दिली. सायंकाळी दै.लोकमत कार्यालयाला भेट देवून वृत्तपत्र निर्मितीबाबतची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी संपादक नंदकिशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून पत्रकारितेच्या बारकाव्यांबाबत टिप्स दिल्या. यावेळी संपादकीय विभागातील उदय जैन, सुमंत अयाचित यांनीही मार्गदर्शन केले.

हा अभ्यास दौरा संचालक प्रा.डॉ.सुधीर भटकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या समवेत प्रा.डॉ.गोपी सोरडे, विद्यार्थी शितल बेलदार, हेमंत चौधरी, पुरूषोत्तम महाजन, मुकुंद नन्नवरे, गोपाल सोनवणे, मुकेश पाटील सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या