चांदवड : राहूड घाटात धावत्या बसने घेतला पेट; २२ प्रवासी बालंबाल बचावले

jalgaon-digital
1 Min Read

चांदवड | प्रतिनिधी

चांदवडनजीकच्या बहुचर्चित राहूड घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतला. या घटनेत बस पूर्णपणे जळून राख झाली आहे तर बसमधील सर्व प्रवासी, चालक वाहक सुखरूप असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे वेळीच बस रस्त्याच्या कडेला थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.

अधिक माहिती अशी की, आज दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास मालेगावकडून एक बस नाशिककडे २२ प्रवाशांना घेऊन निघाली होती. अचानक बसच्या एका बाजूतून धूर निघू लागल्याची बाब चालकाला समजली. चालकाने बसला रस्त्याच्या कडेला उभे करून सर्व प्रवाशांना बाहेर जाण्यास सांगितले.

यानंतर थोड्याच वेळात संपूर्ण बसने पेट घेतला. अचानक बसला लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली उडाली होती. यानंतर अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले होते, सोमा टोलच्या अग्निशमन विभागाकडून आग आटोक्यात आणण्यात आली.

अधिक उन्हाच्या कडाक्यामुळे बसने पेट घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बस पेटल्यामुळे बराच वेळ याठीकांची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, चांदवड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *