आतापर्यंतचे सर्वात कमी कालावधीचे विधिमंडळ अधिवेशन सोमवारपासून

jalgaon-digital
3 Min Read

मुंबई:

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून होणारे दोन दिवसाचे विधीमंडळाचे अधिवेशन हे आत्तापर्यंत सगळ्यात कमी कालावधीचे अधिवेशन ठरणार आहे.

मंंत्र्यांना कोरोनाची लागन

कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत सव्वा आठ लाख पेक्षा जास्त जणांना बाधा झाली असून २५,१९५ रुग्ण आत्ता पर्यंत दगावले आहेत तर सुमारे सहा लाख रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे गृह निर्माण मंत्री, जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे, पशु आणि मत्स्य विकास मंत्री अस्लम शेख यांना ही कोरोनाची लागण झाली होती, तर नुकतेच पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना नेमके अधिवेशनाच्या आधीच दोन दिवस कोरोना संसर्ग झाला आहे.

सर्वांची कोरोना चाचणी होणार

७ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या या पावसाळी अधिवेशासाठी आमदारांची बसण्याची व्यवस्था देखील प्रथमच अभ्यागत आणि विद्यार्थी कक्षात केली आहे. शनिवार आणि रविवार म्हणजे ५आणि ६सप्टेंबर दरम्यान सगळे आमदार आणि अधिवेशन वार्तांकन करणारे पत्रकार तसेच विधानभवन कर्मचारी यांना कोरोना टेस्ट द्यावी लागत आहे, आमदारांना फेस मास्क आणि शिल्ड असे विशेष किट देण्यात येणार आहे.

पी.ए.ना प्रवेश नाही

आमदारांच्या स्वीय सहाय्यक म्हणजे पी .ए. ना विधानभवनात प्रवेश नाही, त्यांची व्यवस्था समोरील वाहन तळा च्या जागेत केली आहे. दोन दिवसाच्या या अधिवेशनात पुरवणी मागण्या, आणि विधेयके असणार आहेत. पुरवणी मागण्या मतदान घेऊन संमत केल्या जातील. प्रश्नोत्तरांचा तास, लक्षवेधी सूचना आणि चर्चा या अधिवेशनात नसतील. असे विधान कामकाज मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

सुशांतसिंगचा मुद्दा गाजणार

अधिवेशनात अंतिम वर्षाच्या परीक्षा, कोविड १९ची राज्यातील स्थिती आणि सुशांत सिंग राजपूत केस यावर विरोधक आवाज उठवण्याची शक्यता आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ८ लाख ६३ हजार ६२ वर पोहचली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८सप्टेंबर रोजी होणार आहे. या अधिवेशनात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. पावसाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात प्रेक्षकांना प्रवेश नाकारला जाणार आहे तर आमदारांच्या पीएना देखील प्रवेश नाकारण्यात आला आहे.

नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशन

विधिमंडळ अधिवेशनाच्या तोंडावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. विधानसभेचे अधिवेशन दोन दिवसांवर आलं आहे. अशात विधानसभा अध्यक्षांचाच अहवाल पॉझिटिव्ह आल्याने, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. ७ आणि ८ सप्टेंबरला विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे दोन दिवसीय अधिवेशनात आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *