Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकलोककलावंतांवर उपासमारीची वेळ

लोककलावंतांवर उपासमारीची वेळ

ओझे । वार्ताहर Dindori / Oze

दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांमधील जनता लोककलेवर आपल्या संसाराचा गाडा चालवितात.

- Advertisement -

परंतु करोनामुळे सर्व काही बंद पडल्याने लोककलावंतावर उपास मारीची वेळ आली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यापासून करोनामुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक, विविध गावातील याञा उत्सव, विविध सोहळे बंद पडल्याने ग्रामीण भागातील लोककलावंताची जीवनाची घडीच घसरली आहे.

पोट भरण्यासाठी काहीनी कर्ज काढून तर काहीनी विविध व्यवसाय तर काही दुसर्‍याच्या शेतावर मोलमजुरीला जावे लागत आहे. त्यामुळे हातात कला असेल तर माणूस उपासी मरत नाही. ही पध्दती करोनामुळे फोल ठरविली आहे. लोक कलावंतासाठी काही महिने महत्त्वाचे असतात.

परंतु मुळ हंगाम करोनात गेल्याने सर्वांना उपासमारीला तोंड द्यावे लागले आहे. सध्या ग्रामीण भागातील जागरण गोंधळ, बोहाडा, दशवतारी कथा, तमाशे, भारूड, किर्तनसेवा, संगीताच्या विविध मैफली आदी गावोगावी जाऊन सादर केल्या जातात.

यातून जो पैसा मिळतो. त्यातून हे कलावंत आपल्या संसाराचा गाडा चालवितात. परंतु यंदा कोणत्याही कलेची बोहणी सुध्दा न झाल्याने संसार कसा चालवावा ही समस्या उभी राहिली आहे. शासनाचा काही कलावंताना मानधन आहे.

परंतु त्यामध्येही वयाची अट असल्यामुळे तरूण पिढीतील सर्व लोककलावंत या योजनेपासुन दुर राहिले आहे. विशेष म्हणजे तरूण कलावंताचाच भरणा जास्त आहे. कलेचा आत्मा समजला जाणारा कलाकारांला उपासमारीची वेळ आल्याने सर्व लोककलावंताच्या भुवया उंचावल्या आहेत.

सर्व कलाकार गरीबीची परिस्थितील असून शिक्षणासाठी पैसा उपलब्ध होत नसल्याने शिक्षण अर्धवट सोडून दिल्याने कुठे चांगल्या ठिकाणी जास्त शिक्षण नसल्यामुळे नोकरी ही लागत नाही. तेव्हा जीवन जगायचे कसे. असा गहण सवाल निर्माण झाला आहे.

कलेचा हंगाम जर चालू राहीला तर महिन्याकाठी पाच ते सहा हजार रुपये सहज मिळत राहात होते. परंतु आता कलेतून मिळणारा पैसा नाही, कुठे नोकरी नाही. कलेची साहित्य घेण्यासाठी घेतलेले कर्ज व त्यामध्ये कौटुंबिक जबाबदारी आदीमुळे तालुक्यातील बरेच असे चांगले चांगले लोककलावंतानी कलेचा मार्ग सोडून शेतमजुरी, एखाद्या छोट्या मोठ्या कंपनीत मजुरी, तर काही जनावरे राखण्यासाठीची कामे सुरु केली आहे.

या संकटातून वाट काढण्यासाठी शासनाने लोककलावंताना अर्थ साह्य द्यावे व शासन नियमानुसार कला सादरीकरणाला परवानगी द्यावी अशी मागणी लोक कलावंतामधून होत आहे.

यंदा करोनामुळे आम्हाला आमची कला कुठेच सादर करता आली नाही. यात्रा, जागरण गोंधळ, सर्व धार्मिक उत्सव बंद पडल्याने कलाकारांना उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे. आज महाराष्ट्रातील लोककलावंत उपासमारीचा सामना करत आहे. डोंगरदर्‍यात, खेडोपाडी राहणारे वयोवृध्द कलावंत परिस्थितीमुळे हतबल झाले आहे. तेव्हा शासनाने अशा कलावंताना वयाची अट न ठेवता निकषांनुसार मानधन द्यावे, जेणेकरून तो कलावंत उपासी राहाणार नाही.

गणपत पाटील, जागरण गोंधळी, निळवंडी

- Advertisment -

ताज्या बातम्या