Thursday, April 25, 2024
Homeनाशिकविंचूरला नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु

विंचूरला नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु

विंचूर । वार्ताहर

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात नाफेड संस्थेमार्फत कृषी साधना शेतमाल उत्पादक सहकारी संस्थेकडून कांदा खरेदी सुरू करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष व इफ्कोच्या प्रथम महिला संचालक साधना जाधव यांनी दिली. नाफेडमार्फत खरेदी करण्यात आलेल्या कांद्याला कमीत कमी 1900 रु. तर जास्तीत जास्त 2101 रु. व सरासरी 2000 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

येथील उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून कांदा काढणी होऊन बाजारात येणार्‍या कांद्याला अपेक्षित दर नाही. त्यामुळे नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू झाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप, सचिव नरेंद्र वाढवणे, बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक पंढरीनाथ थोरे, शिवनाथ जाधव, विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, दीपक खैरे, गोपी जाधव आदींसह कांदा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कांदा खरेदीस प्रारंभ करण्यात आला.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडॉऊनमध्ये बाजार समितीचे कामकाज बंद असल्याने कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहेत. अशातच नाफेडतर्फे विंचूर उपबाजार आवारावर कांदा खरेदीला प्रारंभ करण्यात आल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या