Friday, April 26, 2024
Homeनगरएसटी प्रवासात वृध्द महिलेची सोन्याची पोत चोरली

एसटी प्रवासात वृध्द महिलेची सोन्याची पोत चोरली

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

प्रवास करत असताना एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरून पोबारा केल्याची घटना कोपरगाव ते टाकळी फाटा या दरम्यान घडली. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील माळेगाव थडी येथील महिला विमलबाई आप्पासाहेब शिंदे (वय 70) या कोपरगाव हंडेवाडी या बसमधून प्रवास करत असताना त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची साठ हजार रुपये किंमतीची पोत अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना टाकळी फाटा ते कोपरगाव बसस्थानक परिसरात घडली आहे.

याबाबत विमलबाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दारकुंडे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या