Saturday, April 27, 2024
Homeनाशिकपंचवटीत एसटी कर्मचाऱ्यांच्या घंटानाद

पंचवटीत एसटी कर्मचाऱ्यांच्या घंटानाद

नाशिक | Nashik (प्रतिनिधी)

राज्य परिवहन महामंडळाच्या पंचवटी आगारात कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. यानंतर आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

सद्य:स्थितीत शंभर टक्के चालक, वाहक उपस्थित असताना प्रशासकीय नियोजनाअभावी कामगिरीच मिळत नाही. त्यामुळे समय वेतनश्रेणीवरील व रोजंदार गट दाेन या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन हजर दिवस धरून वेतन अदा करण्यात यावे, यांत्रिक खात्याच्या परिपत्रकानुसार बस मार्गस्थ होण्यापूर्वी संपूर्ण यांत्रिक दोष दूर करणे गरजेचे असताना कार्यशाळा अधीक्षक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे बस दहा ते पंधरा किलोमीटर अंतर पार पडल्यावर नादुरुस्त होतात. २०२० मध्ये ठरलेल्या फेऱ्यांपेक्षा नियमबाह्य फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

ईटीएमआय मशीनची संख्या अपुरी असल्याने बऱ्याचदा वाहकांना त्यासाठी थांबवावे लागते, अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात संघटनेने आंदोलनाची नोटीस दिली होती. प्रशासनाबरोबर चर्चा होऊन प्रश्न सोडवण्यास प्रशासनाने एक महिन्याच्या आत सोडवणूक करू असे लेखी आश्वासन दिले हाेते.

तरीही प्रशासनाने एकही प्रश्न निकाली लावला नाही. याचा महाराष्ट्र एसटी कामगार सेना पंचवटी आगारातर्फे आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून घंटानाद आंदोलन करून निषेध नाेंदविण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र एसटी कामगार सेना विभागीय अध्यक्ष श्याम इंगळे, प्रादेशिक सचिव नितिन जगताप, विभागीय संघटक सचिव भास्करराव उगले, विभागीय कोषाध्यक्ष राजेंद्र पालखेडकर, पंचवटी डेपो अध्यक्ष मुकेश खरोटे, ज्येष्ठ नेते सी. एम. सानप, विभागीय प्रसिद्ध सचिव मोहन गोसावी, विशाल वाजे, संघटक महेंद्र साळी, कोषाध्यक्ष अमेय भोसले, कैलास मोरे, वसंत राठोड, विनोद निकम, राहुल सुरंजे आदीसह सभासद उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या