Wednesday, April 24, 2024
Homeनगरपेट्रोलचे भाव वाढण्याची अफवा पसरली अन....

पेट्रोलचे भाव वाढण्याची अफवा पसरली अन….

करंजी / पाथर्डी l Karnji/Pathardi

तालुक्यात गुरुवार दिनांक ६ मे पासून १६ मे पर्यंत दवाखाना, मेडिकल व वृत्तपत्र वगळता सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहणार असल्याचे आदेश तालुका प्रशासनाने दिलेले असतानाच पेट्रोलचे भावही वाढणार असल्याची अफवा काही भागात वार्‍यासारखी पसरली.

- Advertisement -

या अफवेनंतर पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी पेट्रोल पंपावर तोबा गर्दी केल्याचे करंजी तिसगाव येथे दिसून आले. पाथर्डी तालुक्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने कठोर पावले उचलली असून गुरुवार दिनांक ६ मे पासून १६ मे पर्यंत दवाखाना, मेडिकल व वृत्तपत्र वगळता सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहे.

COVID19 : जिल्ह्यात आज चार हजार ४७५ रुग्णांची नोंद

दरम्यान, दवाखाना, मेडिकल वृत्तपत्रासह अत्यावश्यक सेवेतील लोकांना पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त कोणालाही पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. त्यातच पेट्रोलचे भाव वाढणार असल्याची अफवा पसरली आणि त्यानंतर काही वेळातच पेट्रोल पंपावर नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या. या रांगामुळे पेट्रोल पंपावर कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

पुढील दहा दिवस प्रशासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करायचे असल्याने घराच्या बाहेर पडायचेच नाही मग पेट्रोल भरण्याकरीता गर्दी कशासाठी करायची असा सवाल सामाजिक कार्यकर्ते छानराज क्षेत्रे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या