Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रक्रीडा प्रशिक्षकांची पदे १५ दिवसात भरणार

क्रीडा प्रशिक्षकांची पदे १५ दिवसात भरणार

मुंबई |प्रतिनिधी| Mumbai

राज्यात क्रीडा प्रशिक्षकांची ८० पदे येत्या १५ दिवसात भरण्याची घोषणा क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी विधानसभेत केली. तसेच १२४ तालुक्याच्या क्रीडा संकुलात व्यायामशाळा सुरु करण्यासाठी बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

आज विधानसभेत शालेय शिक्षण, क्रीडा, ग्रामविकास तसेच आदिवासी विकास विभागाच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी चर्चेला उत्तर देताना महाजन यांनी क्रीडा प्रशिक्षकांची १०० पदे रिक्त असून त्यापैकी ८० पदे लवकरच भरण्यात येतील, असे सांगितले. यावेळी त्यांनी ही पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. त्याला शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. आयोगाकडून १५ दिवसात पदे कशी भरणार? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर ४४ पदे ही पदोन्नतीने भरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ग्रामीण भागातील व्यायामशाशाळाना आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे चांगल्या दर्जाचे साहित्य पुरविण्यात येईल. तसेच ग्रामविकास विभागाच्या २५:१५ आणि २५:५४ या लेखाशिर्षाखालील स्थानिक विकास कामांना स्थगिती असली तरी ती रद्द केलेली नाहीत, ही कामे तपासून स्थगिती उठविण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
तर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय गावित यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणखी आश्रम शाळांची परवानगी देण्य्ता येईल, शबरी घरकुल योजनेसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोकणातील शिक्षणाचा patern राज्यभर नेण्याचा निर्धार बोलून दाखवला. सर्वसामान्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून नवे धोरण ठरवताना सध्याचे धोरण जर दूध असेल तर त्यात साखर टाकली जाईल, असे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या