Thursday, April 25, 2024
Homeजळगावमुंबई वाराणसी दरम्यान विशेष गाड्या

मुंबई वाराणसी दरम्यान विशेष गाड्या

भुसावळ – प्रतिनिधी – Bhusaval :

प्रवाशांच्या सवेसाठी मध्य रेल्वेच्यावतीने मुंबई ते वाराणसी दरम्यान सुपरफास्ट विशेष गाड्या चालविण्यात येत आहे.

- Advertisement -

विशेष गाड्यांमध्ये मुंबई-वाराणसी विशेष – गाडी क्र. ०२१९३ सुपरफास्ट विशेष सीएसएमटी येथून दररोज पहाटे १२.१० वाजता रवाना होऊन दुसर्‍या दिवशी पहाटे ३.३० वाजता वाराणसी पोहोचेल.

गाडी क्र.०२१९४ सुपरफास्ट स्पेशल वाराणसी येथून सकाळी १० वाजता रवाना होऊन दुसर्‍या दिवशी सकाळी ११.२५ वाजता सीएसएमटी मुंबई पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बर्‍हाणपूर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, श्रीधाम, मदन महल (केवळ ०२१९३ साठी), जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज चिवकी, विंध्याचल, मिर्झापूर, चुनार, काशी स्थानकावर थांबेल.

गाडीच्या क्रमांकात बदल- गाडी क्र.०१०९३/०१०९४ मुंबई-वाराणसी विशेष गाडीच्या क्रमांकात १ डिसेंबर पासून बदल करण्यात आला असून नवीन क्रमांक ०२१९३/०२१९४ सुपरफास्ट असे वर्गीकृत केले गेले आहे.

गाडी क्र. ०१०९३ सिस्टमच्या अडचणीमुळे सुपरफास्ट म्हणून परिभाषित केली जाईल आणि नवीन नंबर ०२१९३ सिस्टममध्ये परिभाषित करेपर्यंत सुपरफास्ट शुल्क आकारले जाईल.

प्रवाशांनी प्रवाशांनी या गाडीमध्ये आरक्षित केलेल्या तिकिटाचा थकीत सुपरफास्ट फी भरावी लागणार आहे.

केवळ कन्फम आरक्षण असणार्‍या प्रवाशांनाच या गाडीमधून प्रवेश मिळणार आहे. प्रवासा दरम्यान प्रवाशांना कोविड-१९ शी संबंधित नियमांचे पालन करने आवश्यक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या