नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
मध्य रेल्वेने मनमाड-सिकंदराबाद, मुंबई-सिकंदराबाद आणि नांदेड-मुंबई दरम्यान विशेष गाडी सुरु केली आहे.
मनमाड-सिंकदराबाद विशेष गाडी (07063 डाउन) ही 2 डिसेंबरपासून सुरु होत आहे. पुढील आदेशापर्यंत ही गाडी मनमाडहून 20.50 वाजता रवाना होईल.
अप सिकंदराबाद-मनमाड (07064)गाडी 1 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. नागरसोल, रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, उमरी, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, वाडियाराम, मेदचल, बोलाराम येथे ती थांबेल.
नांदेड-मुंबई अप गाडी (07611) 3 डिसेंबरपासून नांदेडहून पासून 22 वाजता सुटेल. मनमाड व नाशिकरोडला ती थांबेल. डाऊन मुंबई- नांदेड (07612)गाडी 4 डिसेंबरपासून मुंबईहून 18.45 वाजता सुटेल. सिंकदराबाद-मुंबई (07058) गाडी 5 डिसेंबरपासून सिकंदराबादहून 13.25 वाजता रवाना होईल.
मनमाड, नाशिकरोडला ती थांबेल. 07057 डाऊन मुंबई-सिकंदराबाद विशेष गाडी 6 डिसेंबरपासून निघेल. कन्फर्म तिकीट असणार्यांनाच या गाड्यांमध्ये प्रवेश मिळेल.