Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकपेठ : सभापती आहेर यांनी साधला अंगणवाडी सेविकांशी संवाद

पेठ : सभापती आहेर यांनी साधला अंगणवाडी सेविकांशी संवाद

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

अंगणवाडी कामकाजासंदर्भात अर्थात कुपोषित बालक, स्तनदामाता, गरोदरमाता, किशोरयीन मुली यांना नियमित आहार दिला जातो का ? याबाबत तसेच कुपोषणासंदर्भात काय उपाययोजना केल्या जातात. या बाबत पेठ येथे अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची बैठक जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती आर्कि. अश्विनी अनिलकुमार आहेर यांनी आयोजित केली होती.

- Advertisement -

बैठकीस पेठ पंचायत समिती सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य सभापती भास्कर गावीत, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहायक गटविकास अधिकारी भूसारे, बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे व १५० अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. आढावा बैठकीत कुपोषण एक मुठ पोषण, अंगणवाडी सेविका-मदतनीस रिक्तपदे, अंगणवाडी इमारत बांधकामे अंगणवाडी इमारत दुरुस्ती, बालमृत्यू व माता मृत्यू, दिव्यांग बालक विविध महिला सक्षमीकरणाचे प्रशिक्षणे, पोषण आहार वाटाप, बेटी बचाव बेटी पढावो, माझी कन्या भागश्री, प. सं. सेस योजना, ग्रामपंचायत दहा टक्के निधी यांबाबत आढावा घेण्यात आला.

त्याच प्रमाणे भरती प्रक्रिया कशी रबावली जाणार ह्याची माहिती सभापती यांनी दिली. करंजाळी येथे महिला व मुलीच्या शिवण कर्तन व व्यूटीपार्लर प्रशिक्षणाचा शुभारंभ सभापती आहेर व पेठ पंचायत समितीचे माजी सभापती पुष्णा गवळी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पेठ येथे जि. प. सदस्य भास्कर गावीत, पेठ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहा, गटविकास अधिकारी भुसारे व बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

पेठ तालुक्यात जानेवारी २०२१ अखेर २1 बालके अतितीव्र कुपोषित असून आरोग्य सेविका, आशा वर्कर यांच्या सहकार्याने सर्व बालकांना नियमित व १०० टक्के लसीकरण करण्यात आलेले आहे. तसेच गरम ताजा आहार व अतिरिक्त पोषण आहार नियमित घरी जावून दिला जात असल्याचावत अंगणवाडी सेविकांची सांगितले. कुपोषण कमी करण्यासाठी पोषणकलगवडी या अतिरिक्त आहाराचा मोठा लाभ होत असुन पोषणकल्पवडी मुळे बालकांच्या वजनात वाढ होत असल्याबाबत सर्वांनी आवर्जुन निदर्शनास आणुन दिले.

पेठ प्रकल्पात अंगणवाडी सेविकांची १७ व अंगणवाडी मदतनोसची ४४ पद रिक्त आहे. रिक्तपदे मार्च २०२१ अखेर भरणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. आदिवासी भागातील अंगणवाडी सेविका-मदतनीसची पदे रिक्त ठेवु नये,असे निर्देश सभापती आहेर यांनी बालविकास प्रकल्पअधिकारी यांना दिले. पेठ प्रकल्पात १३ ठिकाणो अंगणवाडी इमारत बांधकामे अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले.

याबाबत सदरची कामे तातडीने पूर्ण करुन घ्यावीत व विलंबास दोषी असणाऱ्या संबंधीतांवर कार्यवाही करणार असे पेठ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी सांगितले. पेठ प्रकल्पात सध्या महिला व मुलीच्या सक्षमीकरणासाठी शिवणकर्तन व फॅशन डिझाईन, ब्युटीपार्लर कराटे प्रशिक्षण चालू आहेत. ब्युटीपार्लर (३१) शिवणकाम व फैशन डिझाईन (७७) कराटे (१६०) महिला व मुलोंना प्रशिक्षण देणे चालु आहे. प्रशिक्षणाचा जास्तीत महिला व मुलींनी सहभाग घेवून तांत्रिक व व्यावसायिकदृष्या प्रशिक्षित व्हावे, भविष्यात स्वत: आर्थिकदृष्टया सक्षम होणेसाटी सदर प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.

नारी ही अबला न राहता सबला होणे गरजेचे आहे, असे सभापती यांनी सर्व उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना सांगितले.कोवीड काळात आपल्या महिला व बालविकास विभागाने अतिशय उत्कृष्ट कामकाज केले असुन अगणवाडी सेविका-मदतनीस यांच्या सहकार्यामुळेच बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी झालेले आहे. ही बैठक ही अंगणवाडी कामकाज आढावा नसुन सभापती अश्विनी आहेर यांनी अंगणवाडी सेविका यांना कामाचे प्रोत्साहन देण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन कार्यशाळाच घेतली असल्याबाबत जि. प. सदस्य भास्कर गावोत यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात कुपोषणाचे प्रमाण कमी झालेले आहे.

मात्र, आपल्याला पेठ तालुका व त्याबरोबरच नाशिक जिल्हा कुपोषण मुक्त करावयाचा आहे.यादृष्टीने सर्वांनी प्रयत्नशील राहावयाचे आहे, असे आश्वासन अंगणवाडी सेविका यांचेकडून सभापती आर्कि. अश्विनी आहेर यांनी वदवुन घेतले. तसेच पोषणआहार वाटपाबाबत कुचराई केल्यास संबंधीतांवर कारवाई केली जाईल, असे सांगितले. पेठ तालुक्यात बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत ‘माझ्या मुलीचे बारसे’ हा नाविन्यपुर्ण उपक्रम सुरु केलेला आहे. या उपक्रमात नवीन जन्म झालेल्या बालिकेच्या घरी स्वतः अंगणवाडी सेविका मदतनीस व पर्यवेक्षिका जावून सजावट करुन त्यांचे पालकासोबत आनंदसोहळा साजरा करणार आहेत. मुलगा-मुलगी यामधील भेदभाव कमी करण्यासाठी पालकांचे व ग्रामस्थांचे प्रबोधन करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या