राहाता बाजार समितीत सोयाबिन व कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

jalgaon-digital
2 Min Read

राहाता (तालुका प्रतिनिधी)

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत काल गुरुवार ६१३५ गोणी कांदा आवक झाली. कांद्याला सर्वाधिक १८०० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सोयाबीनला ७३८५ रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत काल हजार १३५ कांदा गोणी ६ आवक झाली. कांदा नंबर १ ला १४०० रुपये ते १८०० रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर २ ला प्रतिक्विंटलला ८५० ते १३५० रुपये भाव मिळाला. कांदा नंबर ३ ला ४०० ते ८०० रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा १००० ते १२०० रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला १०० ते ४०० रुपये भाव मिळाला.

सोयाबिनला सरासरी ७३८५ असा भाव मिळाला. हरभरा कमीत कमी ४५२५ रुपये, जास्तीत जास्त ४५८४ रुपये, तर सरासरी ४५५० रुपये असा भाव मिळाला. मका कमीत कमी १८९९ रुपये, तर जास्तीत जास्त २०७७ व सरासरी १९७५ रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

राहाता बाजार समितीत डाळिंबाच्या १५८५ क्रेटसची आवक झाली. डाळिंब नंबर १ ला प्रतिकिलोला ७१ ते ११० रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर २ ला ४६ ते ७० रुपये भाव मिळाला. डाळींब नंबर ३ ला २६ ते ४५ रुपये भाव मिळाला. तर डाळिंब नंबर ४ ला १० ते २५ रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

चिकूच्या ३० क्रेट्सची आवक झाली. चिकूला क्विंटलला कमीत कमी ३०० रुपये, जास्तीत जास्त ११५० रुपये, तर सरासरी ७५० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *