Thursday, April 25, 2024
Homeक्रीडादक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! क्विंटन डी कॉकची अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! क्विंटन डी कॉकची अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

दिल्ली | Delhi

दक्षिण अफ्रिका (South Africa) संघातील विकेटकीपर आणि गोलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) यांने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. क्विंटन डी कॉकने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

क्विंटनने कुटुंबाला वेळ देण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे. ‘मी हा निर्णय सहज घेतलेला नाही. हा निर्णय घेण्याआधी मी प्रचंड विचार केला. मी माझ्या भविष्याचा भरपूर विचार केला. पण माझी पत्नी साशा आणि मी आमच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहोत. त्यामुळे आयुष्यात नेमकं कशाला प्राधान्य द्यावं, याबाबत मी भरपूर विचार केला. माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वकाही आहे. आमच्या आयुष्यातील या नव्या आणि रोमांचक अध्यायात कुटुंबासोबत सहभागी होण्यासाठी मला वेळ हवा आहे’, असं क्विंटन डी कॉक म्हणाला आहे.

डी कॉकने दक्षिण आफ्रिकेकडून ५४ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३३०० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी ३८.८३ राहिली आहे. डी कॉकने कसोटी सामन्यांमध्ये सहा शतके आणि २२ अर्धशतके झळकावली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या