Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाT20 World Cup 2021 : दक्षिण आफ्रिका, विंडीज पहिल्या विजयासाठी आज समोरासमोर

T20 World Cup 2021 : दक्षिण आफ्रिका, विंडीज पहिल्या विजयासाठी आज समोरासमोर

दुबई | Dubai

आयसीसी टी २० वर्ल्डकप २०२१ (ICC T20 World Cup 2021) सुपर १२ मध्ये आजचा पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन विंडीज (West Indies) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर दुपारी ३:३० वाजता खेळवण्यात येणार आहे….

- Advertisement -

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. दोन्ही संघांसाठी आजच्या सामन्यात विजय अनिवार्य असणार आहे. आजच्या सामन्यात विजय नोंदवणाऱ्या संघाला स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्याची संधी मिळणार आहे. तर पराभूत संघाची वाटचाल अधिक खडतर होणार आहे.

दक्षिण आफ्रिका (SA) क्रिकेट संघाला आपल्या पहिल्या सामन्यात कांगारूंकडून ५ गड्यांनी अखेरच्या षटकात रंगलेल्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. या सामन्यात आफ्रिका संघाचे आघाडीचे फलंदाज कर्णधार टेम्बावा बाऊमा, क्विंटन डिकॉक, डेविड मिलर, आणि पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सराव लढतीमध्ये झुंजार शतक ठोकणारा रुसी वेन्डरड्युसेन ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध स्वस्तांत माघारी परतले होते.

एडम मार्क्रमचा अपवाद वगळता एकाही फलंदाजला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यांच्याकडून चांगली कामगिरी संघाला आजच्या सामन्यात अपेक्षित आहे.

दुसरीकडे विंडीजला (WI) पहिल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध ५५ धावांचा पल्ला गाठता आला होता. या सामन्यात विंडीजचे लेंडल सिमेन्स, इविन लुईस, गेल, किरॉन पोलार्ड, आंद्रे रसेल, शिमरॉन हेटमायर हे सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले होते. आजच्या सामन्यात या सर्व आघाडीच्या फलंदाजांना आपला खेळ उंचावावा लागणार आहे.

शिवाय दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विंडीज संघाची धावगती इतर सर्व संघाच्या तुलनेत अतिशय खराब आहे. त्यांना आपले उर्वरीत सर्व सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहे. दोन्ही संघाना स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवण्याची ही शेवटची संधी आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या