Friday, April 26, 2024
Homeनाशिकमहाराष्ट्र इंजिनिअर्स असो. अध्यक्षपदी सोनवणे

महाराष्ट्र इंजिनिअर्स असो. अध्यक्षपदी सोनवणे

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्या नाशिक शाखेच्या झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून जिल्हा अध्यक्षपदी निसर्गराज सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

- Advertisement -

सरचिटणीसपदाची जबाबदारी विनायक माळेकर तर, कोषाध्यक्षपदी संदीप वाजे यांची एकमताने निवड झाली. महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनच्या नाशिक शाखेची बैठक मावळते जिल्हाध्यक्ष आर. टी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. नूतन जिल्हा कार्यकारिणी निवडीबाबत चर्चा होऊन, सरचिटणीसपदी असलेले सोनवणे यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.

त्यांनतर कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असलेले माळेकर यांना पदोन्नती देत सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

संदीप वाजे यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी निश्चित व घोषीत करण्याचे सर्वाधिकार जिल्हाध्यक्ष सोनवणे यांना बहाल करण्यात आले. निवड प्रक्रीया झाल्यानंतर संघटनेच्या अडचणींबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागात काम करतांना मोठया अडचणी येत असल्याच्या तक्रारी अनेक इंजिनिअर्स यांनी मांडल्या. या अडचणी संघटनेच्यामार्फत दूर केल्या जातील, असे यावेळी सांगण्यात आले.

ग्रामविकास विभागातील २५१५ लेखाशिर्षकांतर्गत मुलभूत सुविधा विकास कामांचा ५० कोटींचा निधी शासन दरबारी अडकला आहे. निधी अडकल्याने इंजिनिअर्स, छोटे-मोठे ठेकेदार अडचणीत सापडले असल्याचे सांगण्यात आले.

अडकलेल्या निधीसाठी लवकरच शासन दरबारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेण्याचा निश्चय बैठकीत झाला. जिल्हा परिषदेतील कामांच्या फाईल प्रवास कमी करण्यावरही चर्चा झाली.

मजूर संस्थांच्या धर्तीवर संघटनेसाठी निधी जमा करण्याचे आवाहन यावेळी संघटनेने केले. संघटनेत जास्तीत जास्त युवा जोडण्यासाठी तसेच त्यांना काम करण्याची संधी दिली जाईल. ठेकेदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे ग्वाही नवनिर्वाचीत अध्यक्ष सोनवणे यांनी यावेळी दिली.

बैठकीस संघटेनेचे संस्थापक योगेश कासार-पाटील, संजय आव्हाड, रियाज शेख, अजित सकाळे, अनिल दराडे, संजय कडन्नोर, अनिल आव्हाड, राहुल पवार, सुमीत बुनगे, सागर सोनवणे, प्रकाश सानप, अतुल टर्ले, प्रतिक देशमुख, पवन पवार, निखील कुंदे, अमोल मोरे, अल्पेश शहा, अजय गाढवे, मुराद सेख, योगेंद्र जाधव, बाळासाहेब नाईक आदी उपस्थित होते. चंद्रशेखर डांगे यांनी सूत्रसंचालन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या