Friday, April 26, 2024
HomeUncategorizedVISUAL STORY : सोनम कपूरने फोटो शेअर करत दिली ‘गूड न्यूज’

VISUAL STORY : सोनम कपूरने फोटो शेअर करत दिली ‘गूड न्यूज’

बॉलिवूडची फॅशन आयकॉन (Bollywood fashion icon) सोनम कपूर आहुजा (sonam kapoor ahuja) लवकरच आई होणार आहे. अभिनेत्री लवकरच तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे. ज्याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत शेअर केली आहे.

फोटो शेअर करताना सोनम कपूरने तिच्या मुलासाठी एक अतिशय गोंडस संदेशही लिहिला आहे. ‘चार हात. तुला मोठे करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू, दोन हृदये, जी तुमच्याशी एकरूप होऊन धडधडतील. एक कुटुंब जे तुम्हाला खूप प्रेम देईल. आम्ही तुमचे स्वागत करण्यासाठी थांबू शकत नाही.” (sonam kapoor pregnant)

- Advertisement -

यासोबतच सोनम कपूरने रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केले आहे. सोनमच्या या फोटोंवर बॉलिवूड स्टार्सच्या कमेंट्स येऊ लागल्या आहेत. भूमी पेडणेकरने या जोडप्याला हार्ट इमोजी देऊन शुभेच्छा दिल्या. (sonam kapoor pregnancy)

एकता कपूर, जान्हवी कपूर, करीना कपूर, रवीना टंडन, करिश्मा कपूर यांनी सोनमच्या फोटोवर कमेंट करून आपले प्रेम व्यक्त केले आहे. या बातमीने कपूर कुटूंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

दरम्यान याआधीही सोनम प्रेग्नंट असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या अफवा असल्याचे म्हटले होते. (anand ahuja)

अनेक वर्षे डेट केल्यानंतर सोनम आणि आनंदने (sonam kapoor husband) २०१८ मध्ये लग्न केले. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सोनम कपूरने ‘सावरिया’ या चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या