Friday, May 10, 2024
Homeनाशिकद्वारका चौक वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा

द्वारका चौक वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवा

जुने नाशिक | प्रतिनीधी | Old Nashik

नाशिक शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या द्वारका चौकातील (Dwarka Chowk) वाहतूक कोंडीची (traffic jam) समस्या सुटावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र मागील कित्येक वर्षापासून हा प्रश्न तसच पडून आहे.

- Advertisement -

या ठिकाणी महापालिकेने विशेष अतिक्रमण मोहीम (Special Encroachment Campaign) घ्यावी, त्याचप्रमाणे द्वारका चौकातील वाहतूक कोंडी (traffic jam) कमी होऊन देशभरातून येणार्‍या भाविकांना पवित्र गंगाघाटावर जाण्यासाठी सुविधा व्हावी, या उद्देशाने द्वारका चौकात भुयारी मार्ग (Subway) तयार करण्यात आले आहे. मात्र त्याचा उपयोगच होत नसल्याने त्यातून दुचाकी जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

द्वारका येथील भुयारी मार्ग (Subway) भले मोठे असून त्यात मनपा प्रशासनाने सिबीएस (CBS) प्रमाणे भुयारी मार्गात पालिका बाजार म्हणजे गाळे तयार केल्यास बेरोजगारांना देखील रोजगार (Employment) उपलब्ध होऊन मनपाला महसुल (revenue) मिळेल. नाशिक शहराचे प्रवेशद्वार म्हणून जगभर प्रसिध्द द्वारका चौफूलीवरील नियमीत होणारी वाहतूक कोंडी (traffic jam) कमी करण्यासाठी अनेक वेळा योजना तयार करण्यात आल्या आहेत, मात्र यातील एकही योजना सफल झालेल्याचे दिसते.

लहान मोठे सुमारे 16 मार्ग याठिकाणाहून जातात. मात्र त्यांचे नियोजन नसल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत या मुख्य चौकात वाहतूक कोंडी (traffic jam) कायम असते. सायंकाळी तर अर्धाअर्धा तास वाहनचालकांना चौक क्रॉस करण्यासाठी वेळ जातो.मागील अनेकवर्षांपासून द्वारका चौकाचा श्वास वाहतुकीच्या कोंडीत अडकला असून, हा चौक कधी मोकळा श्वास घेणार असा प्रश्न कायम आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या