Tuesday, April 23, 2024
HomeअहमदनगरVideo : महापालिका आरोग्य केंद्रावर गर्दी कायम, नियमांचाही फज्जा

Video : महापालिका आरोग्य केंद्रावर गर्दी कायम, नियमांचाही फज्जा

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

मागील काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांचा आकडा (Corona cases) कमी होत असला, तरी धोका अजून कायम आहे. करोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा (Corona virus 3rd wave) धोका तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे तिसरी लाट रोखण्यासाठी व्यापक प्रमाणावर लसीकरण (corona vaccination) गरजेचं आहे. पण लसीकरण केंद्रावरचं नागरिक तुफान गर्दी (Crowd) करत असल्याचं चित्र समोर आलं आहे.

- Advertisement -

नगर महापालिकेच्या (AMC) नागापूर आरोग्य केंद्रावर (Nagpur Health Center) गर्दीचे सावट कायम आहे. आरोग्य केंद्रावरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका व पोलीस (Police) प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे गर्दी कायम पाहायला मिळत आहे.

१५ दिवसाच्या खंडांनंतर आज कोविशील्ड लसीचा दुसरा डोस (Covishield Vaccine second dose) होता. त्यामुळे नागरिकांनी सकाळी ५ वाजेपासून आरोग्य केंद्रावर आले होते. कोविशील्ड (Covishield) लस खंडांनंतर येत असल्याने नागरिकांची गर्दी होत आहे.

पोलिसांचे वरतीमागून घोडे

नागापूर (Nagapur) आरोग्य केंद्रावर एकच पोलीस कर्मचारी असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. त्यामुळे नागरिक व पोलीस यांच्यात बाचाबाची झाल्याने काही काळ लसीकरण बंद करण्यात आले होते. नंतर काही वेळाने एक महिला पोलीस व पुरुष कर्मचारी आल्यावर लसीकरण पूर्ववत करण्यात आले.

ऑनलाईन नोंदणीची नागरिकांना अट

नागापूर आरोग्य केंद्रात नागरिकांना ऑनलाईन नोंदची अट ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गोधळ होत आहे. नेमकं महापालिकेने ऑनलाईन नोंदीची अट ठेवली आहे का? याचा खुलासा होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये आक्रोश पहायाला मिळत आहे.

आले 150 डोस देतात नागरिकांना 100 डोस

आज कोविशील्डची लस प्रत्येक आरोग्य केंद्रावर 150 डोस आहे आहे. परंतु 100 डोस देण्यात येत आहे. 50 डोस कोणासाठी आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांनी 100 डोसचे यादी विचारली असता नागापूर आरोग्य केंद्राकडे याची माहितीच नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या