सामाजिक भान : प्रतिज्ञेतील सौजन्य वास्तवातही हवे

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधार्‍या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन, अशी प्रतिज्ञा प्रत्येकाने शालेय जिवनात घेतलेली असते. आजही अनेक जण घेतही मात्र, ती प्रतिज्ञा नंतर आयुष्यातून कशी गायब होते याचे कोडे अद्याप सुटलेले नाही. प्रत्येकाकडून किती वेळा प्रतिज्ञा मोडते, हे एकदा प्रत्येकाने आत्मपरीक्षण केले पाहिजे. तसे नसते तर वसंत सबनीस यांच्यासारख्या दिग्गज लेखकाला सौजन्याची एैशी तैशी, हे नाटक का लिहावे लागले? आजही ते नाटक रंगभूमीवर का गाजते? याचे उत्तर त्या नक्कीच सापडेल….

प्रत्येकाच्या अवती भोवती तीन प्रकारचे लोक राहतात. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध अन् वयाने लहानही असूनही तपसाधनेतून एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन ज्ञानाने आणि कर्माने मोठे झालेले. रोज सुप्रभात, शुभरात्री मेसेजेस, नात्यांचे महत्व, मुलगी आणि वडिलांमधला जिव्हाळा सांगणार्‍या कविता, घरकाम श्रेष्ठ्काम, प्रेरणादायी भाषणांचे व्हिडीओ अशा विविधतेने नटलेल्या व्हॉटसअ‍ॅपचा मारा करणारे, या पाईक होण्याची पात्रता अंगी यावी म्हणून इतरांना प्रेरणा देणारे लोक सर्वत्र दिसतात.

पण प्रतिज्ञेप्रमाणे मी माझ्या पालकांचा आणि गुरुजनांचा मान ठेवीन, प्रत्येकाशी सौजन्यानेच वागेन हे सांंगता येत नाही. ते सौजन्य दुसर्‍याकडुन अपेक्षित असते. आपण दुसर्‍याला ते देऊच याची शाश्वती देता येत नाही.

एखाद्याला अचानक पैशाची गरज भासते. पैशांची अडचण लक्षात येते. आपण भावनेच्या भरात पैसे देेऊन मोकळे होतो. नंतर मात्र चार पाच महिने होतात तरी परत देण्याचे तो नाव घेत नाही. त्यामुळे त्यावर पाणी सोडावे लागते. परंतु अशा वेळी सौजन्याची मात्र ऐशीतैशी झाल्याचे प्रकर्षाने जाणवते.

सोशल मीडियावर कधीतरी मेैत्री होते अन् समोरचा अचानक गळी पडतो. अशावेळी मदत करावी नाही? सौजन्य दाखवावे की नाही असा प्रश्न अनेकांंना ंपडतो. कारण ते पैसे परत येतीलच याची खात्री नसते. अशा वेळी सैाजन्य खऱोखर कोमात गेल्याशिवाय राहत नाही.

असे असले तरी समाजात काहीजण प्रामाणिक आहेत म्हणुन सोजन्य टिकुन आहे. अशा वेळी सौजन्याला वाली असल्याचे जाणवते. मदत करणे माणुसकी आहे पण दिलेला शब्द तितकेच महत्वाचे असते. त्यामुळे नंतर कुणी मदत मागायला आला तर विनासायास मदत मिळते. नाही तर एकदा तापलेल्या दुधाने तोंड पोळले की माणसे ताकही फुंकून पितात. त्यामुळे खर्‍या गरजवंंताला वंचित राहावे लागते. म्हणूनच समाजात सैाजन्याची भावना टिकून ठेवणे ही काळाजी गरज आहे.

मानवाच्या जीवनात त्याची माता त्याचा प्रथम गुरु असत. त्याला जन्मापासून बोलायचे, चालायचे, धावायचे प्राथमिक धडे शिकविते. पाटीवर हाताला धरून मुळाक्षरे गिरवायला शिकविते. मुले शाळेत जायला लागली की आईवडील त्याला जगाचे व्यावहारिक ज्ञान देतात. आई-वडिलांप्रमाणेच आपल्या जीवनात गुरुचे स्थान तितकेच महत्वाचे आहे. आपल्या संस्कृतीत गुरूला साक्षात परब्रम्हाची उपमा दिली आहे. आपल्या गुरूंमुळेच जीवनाची नौका पार होते. गुरूबद्दल संत म्हणतात, गुरु बिन कौन बतावे बाट । मात्र मोठे झाल्यावर त्यांच्याविषयी तेवढाच कृतज्ञ भाव राहिला तर एकही वृध्द आई, वडील, गुरु मदतीपासून वंंचीत दिसणार नाही

सौजन्य केवळ प्रतिज्ञेपुरते नसुन ते खरोखर अमलात आणण्याची व ते लोप पावणार नाही याची दक्षता घेण्याची बाब आहे.

– नरेंद्र जोशी.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *