Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशजम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

श्रीनगर –

सध्या देशभरात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट असून उत्तर भारतातील राज्यांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता मोठ्या प्रमाणात

- Advertisement -

हिमवर्षाव सुरू झाला असून काश्मीर खोर्‍यात बर्फाची पांढरी चादर पाहायला मिळत आहे. तर श्रीनगरच्या रस्त्यांवर, घरांवर सर्वत्र बर्फाचे सुंदर दृश्य पाहायला मिळत आहे. तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या काही भागात बर्फवृष्टी सुरु आहे.

सध्या काश्मिरातील तापमानाचा पारा 1 अंशांखाली घसरला आहे. दरम्यान, दरवर्षी हिवाळा सुरू झाला की या भागात पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. यंदाही याठिकाणी पर्यटक हजेरी लावत आहेत. बर्फवृष्टीमुळे पर्यटन व्यवसायालाही फायदा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या