औरंगाबादमध्ये ‘प्रवास करा मनसोक्त’ योजना!

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद (Smart City Development Corporation) स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशने स्मार्ट सिटी बसचा (Smart City Bus) ‘प्रवास करा मनसोक्त’ ही योजना जाहीर केली आहे. दोन हजार रुपये भरा आणि ३० दिवसांचा पास घ्या आणि कोणत्याही मार्गावर कितीही प्रवास करा अशी ही योजना आहे. याशिवाय अन्य योजनादेखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

शहरात लोकप्रिय ठरलेली स्मार्ट सिटी बस सेवा पुन्हा नव्या दमाने सुरू करण्याची तयारी स्मार्ट सिटी प्रशासनाने केली आहे, येत्या काही दिवसांतच शहरात ९० बस धावण्याचे नियोजनही करण्यात येत आहे. प्रवाशांना आकर्षिक करण्यासाठी स्मार्ट सिटीकडून नवनवीन योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.

त्यात दिवसाला ८० रुपये भरा दिवसभर शहरात कुठेही प्रवास करा या योजनेचादेखील समावेश करण्यात आला आहे. यासोबतच साप्ताहिक रिचार्ज अंतर्गत पाच दिवसांचे पैसे भरून सात दिवसांच्या प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. मासिक योजनेत नागरिकांना वीस दिवसांचे पैसे भरून तीस दिवस प्रवास करता येणार आहे. त्रैमासिक योजनेत साठ दिवसांचे पैसे भरून नव्वद दिवस प्रवासाची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. चालक तसेच वाहकांच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने सिटी बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू केली जाणार असल्याचे ‘स्मार्ट सिटी’कडून कळवण्यात आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहर बस पूर्ण क्षमतेने धावत नसल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. कोरोना तसेच एसटीचा संप यामुळे कायम सिटीबसने प्रवास करणार्‍या बहुतांश प्रवाशांनी प्रवासाचे इतर मार्ग निवडले होते, आता स्मार्ट सिटी बसने प्रवाशांसाठी आकर्षक योजना सुरू केल्याने सिटीबसकडे पुन्हा मोठ्या प्रमाणावर प्रवासी आकर्षित होतील असा विश्वास प्रशासनाला आहे.

नियोजन पूर्ण

पाच टप्प्यांत पूर्ण क्षमतेने सिटी बस सुरू करण्यात येणार असून यासंदर्भातील तयारी पूर्ण झाली आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून गाड्या तसेच गाड्यांचे वेळापत्रक, कंट्रोल पॉइंट आदी बाबींची पूर्ण तयारी करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *