Thursday, April 25, 2024
Homeनाशिकस्मार्ट सिटी मिशन : आज देणार तंत्रज्ञान व विकास कामांंची माहीती

स्मार्ट सिटी मिशन : आज देणार तंत्रज्ञान व विकास कामांंची माहीती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्मार्ट सिटी मिशनच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील 100 स्मार्ट सिटी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने स्मार्ट स्कुलच्या शिक्षकांशी संवाद साधून त्यांना स्मार्ट स्कूल कशी कार्य करणार याबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. सोमवारी सर्वसामान्यांना ध्वनीचित्रफितीद्वारे माहिती देण्यात येणार आहे.

- Advertisement -

नाशिक म्युनसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. च्या कार्यालयात स्मार्ट सिटी मिशन वर्धापन दिनाच्या निमित्ताने दि.23रोजी सिटी लेव्हल अ‍ॅडव्हायझरी फोरमची बैठक पार पडली. सदर बैठकीत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, आर्किटेक्ट अँड इंजिनीयर असोसिएशन चे प्रतिनिधी आणि नाशिक स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे तसेच सर्व विभाग प्रमुख आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

नाशिक स्मार्ट सिटी ने या वर्धापन दिनाच्या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ज्यामध्ये प्रथम काठे गल्लीतील मनपा शाळा क्र. 43 या स्मार्ट स्कूलमध्ये प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डिजिटल युगामध्ये आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे फायदा होणार आहे व त्यासाठी त्यांना कशा प्रकारचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे या सगळ्यांची माहिती यावेळी सर्व मनपाच्या मुख्याध्यापकांना व शिक्षकांना देण्यात आली. प्रत्यक्षपणे त्यांना डिजिटल उपकरणांची ओळख करून ते कशाप्रकारे वापरायचे याबाबतचे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

प्रशिक्षणासोबतच वर्धापन-दिनानिमित उपस्थितांना नॉलेज हब ग्रुप मधील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी नाशिक स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन नाशिक स्मार्ट सिटीच्या चालू असलेल्या कामांच्या व पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेतला. प्रत्यक्षपणे कमांड कंट्रोल सेंटर मध्ये कशा पद्धतीचे काम चालते हे समजून घेतले व प्रत्यक्ष तिथून कशाप्रकारे मॉनिटरिंग केली जाते, कमांड कंट्रोल सेंटरचे काय फायदे आहेत याबाबतची सर्व माहिती जाणून घेतली.

प्रत्यक्षात नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सोमवारी (दि.26) स्मार्ट सिटी मिशन कशा पद्धतीने काम करते व त्याद्वारे लोकांना जागृत करण्यासाठी एक अनोखा उपक्रम नाशिक स्मार्ट सिटीद्वारे राबवण्यात येत आहे. सोमवारी (दि.26) सकाळी 11.30 ते 1.30 च्या नाशिक स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये नागरिकांना स्मार्ट सिटी मिशन े तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांसाठीच्या प्रकल्पांचा भविष्यातील फायदा,याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

आज (दि.26) चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. तुमच्या दृष्टिकोनातून स्मार्ट सिटी म्हणजे नेमकी काय व ती कशी असायला हवी याविषयी चित्राद्वारे रेखाटून एक अनोखा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासोबतच प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना स्मार्ट सिटी मिशन कधी सुरू झाले? स्मार्ट सिटी मिशनचे उद्देश्य काय? स्मार्ट सिटी मिशनचे फायदे काय? याबाबतची माहीती जाणून घेता येणार आहे. तसेच नागरिकांना तंत्रज्ञान आपल्याला किती उपयुक्त आहे, याबाबतचे सादरीकरण दाखवण्यात येणार आहे.

चित्रफितीतून प्रकल्पांची माहिती

स्मार्ट सिटी तर्फे पूर्ण झालेल्या प्रकल्पांची माहिती ध्वनी चित्रफितीद्वारे देण्यात आली. विशेषतः यात पर्यावरण सेन्सर, विद्युत स्मशानभूमी, क्षेत्र निहाय विकासांतर्गत येणारे रस्ते इत्यादी विषयांचा समावेश होता. तसेच माहिती तंत्रज्ञान या संदर्भातील येणार्या प्रकल्पामध्ये स्मार्ट वॉटर मीटर, स्काडा, सीसीटीव्ही कॅमेरे, कमांड कंट्रोल सेंटर, पब्लिक वाय फाय, जीआयएस मॅपिंग, स्मार्ट स्कूल या सर्व प्रकल्पांची माहिती देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या