पुरातत्त्व विभागाच्या नियमांना स्मार्ट सिटीचा हरताळ

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गेल्या 2 दिवसांपासून गोदाकाठ परिसरात सुशोभीकरणाच्या (Beautification work of godavari river bank ) नावाखाली चालू असलेल्या तोडफोडीबाबत ज पुरातत्व विभागाने पाहणी केली. या पाहणीत पुरातत्व विभागाची कोणतीही परवानगी न घेता संरक्षित क्षेत्र असलेल्या निलकंठेश्वर मंदिराच्या ( Nilkantheshvar Temple- Panchavati ) पुरातन पायर्‍या तोडण्यात आल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या ( Smart City Company )मनमानीपणाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत पुरातत्व विभागाच्या वतीने स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे. नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या वतीने गोदावरी व परिसरात तब्बल 65 कोटी रुपये खर्च करत गोदा ब्युटीफेशन अंतर्गत विविध कामे केली जात आहे.

याच कामाचा भाग म्हणून पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या नीलकंठेश्वर मंदिर परिसरात थेट जेसीबीच्या सहाय्याने अनेक वर्षांचा इतिहासाचा साक्षीदार असलेल्या पायर्‍या तोडण्यात आलेल्या आहेत. तसेच या प्रकारामुळे या ठिकाणी असलेले धार्मिक वास्तूना देखील तडे गेले आहेत. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक आरती आळे (Aarti Ale, Assistant Director, Department of Archeology )यांनी या परिसराची पाहणी केली.

यावेळी स्मार्ट सिटीच्या वतीने करण्यात आलेल्या कामासाठी कोणतीही परवानगी न घेतल्याने याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत तातडीने स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला नोटीस बजावत याबाबत खुलासा मागविण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीकडून नियमांंचा भंग

पुरातत्व विभागातील महत्वाच्या कलमांतर्गत वास्तूच्या 300 मीटरच्या परिघात कुठलेही बांधकाम, दुरुस्ती पुरातत्व विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय करु शकत नाही. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने परवानगी न घेता हे काम करण्यात आल्याने थेेट फौजदारी कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

पायर्‍या जैसे थे करण्याची मागणी

पुरातत्व विभागाने याकामाबाबत आक्षेप घेतला आहे. स्मार्ट सिटीने तातडीने पुरातन पायर्‍या जैसे थे करण्याबाबत स्मार्ट सिटीकडे मागणी करणार असल्याचे यावेळी पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक आरती आळे यांनी सांगितले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *