Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसंतापजनक! भूतबाधेतून मुक्ततेसाठी आई-वडिलांची मुलीला जबर मारहाण; चिमुकलीचा मृत्यू

संतापजनक! भूतबाधेतून मुक्ततेसाठी आई-वडिलांची मुलीला जबर मारहाण; चिमुकलीचा मृत्यू

नागपूर | Nagpur

नागपूरमधून एक संतापजनक वृत्त समोर येत आहे. भूतबाधेतून (Black Magic) मुक्त करण्यासाठी आई-वडिलांनी पोटच्या मुलीला केलेल्या मारहाणीत (Beaten) पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरमधील सिद्धार्थ चिमणे (Siddhar Chimane) गेल्या महिन्यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपली पत्नी आणि दोन मुलींना घेऊन दर्गामध्ये गेला होता.

तेव्हापासून आपल्या लहान मुलीच्या वागण्यात बदल झाल्याचा संशय त्याला येत होता. आपल्या मुलीला भूतबाधा झाली असून ती घालवण्यासाठी काळी जादू (Black Magic) करण्याचे त्याने ठरवले.

सिन्नरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार! आमदारांच्या सख्ख्या भावासह कार्यकर्ते जाणार शिवसेनेत

मुलीच्या आई, वडिल आणि मावशीने मिळून काळी जादू केली आणि हा सगळा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. पोलिसांना (Police) मोबाइलमधून हा व्हिडीओ मिळवला आहे. या व्हिडीओत आरोपी वडील रडणाऱ्या आपल्या मुलीला काही प्रश्न विचारत असल्याचे दिसत आहे.

काळी जादू करत असताना तिघांनीही मुलीला अनेकदा कानाखाली मारली, तसेच मारहाणही केली. यानंतर मुलगी बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळली. यानंतर आरोपीने मुलीला शनिवारी सकाळी दर्ग्यात नेले. नंतर तिला सरकारी रुग्णालयात दाखल करुन तिघांनी पळ काढला.

Video : …तर राऊतांना आमच्या शुभेच्छाच; भुजबळांनी सांगितला अनुभव

डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित करुन पोलिसांना कळवले. सुरक्षारक्षकाला संशय आल्याने सिद्धार्थ याच्या गाडीचा फोटो काढला होता. गाडीच्या नंबर प्लेटवरुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. पोलिसांनी मुलीचे वडील सिद्धार्थ चिमणे, आई रंजना आणि मावशी प्रिया बनसोड यांना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आधी पक्षप्रमुख उल्लेख टाळला, आता थेट…; एकनाथ शिंदेंचे नवे ट्विट चर्चेत

- Advertisment -

ताज्या बातम्या