Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यापोलीस अधीक्षकांची गाडी अडवणे भोवले; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलीस अधीक्षकांची गाडी अडवणे भोवले; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

गेल्या आठवड्यात टोल कर्मचाऱ्यांनी (Toll Staff) एका दैनिकाच्या उपसंपादकास बातमी दिली म्हणून दमबाजी करण्याची घटना घडली होती. यानंतर काल रात्री एका टोल कर्मचाऱ्याने चक्क पोलिस अधीक्षकांचीच गाडी अडवण्याचा प्रयत्न पिंपळगाव टोल नाक्यावर (Pimpalgaon Toll Gate) केला होता. त्यानंतर आता याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात (Pimpalgaon Police Station) टोल नाक्यावरील सहा कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगावकडून नाशिकच्या (Pimpalgaon to Nashik) दिशेने पोलीस अधीक्षक सचिन पाटील (SP Sachin Patil) यांचे शासकीय वाहन जात होते. सदर वाहन टोल नाक्याच्या लेनजवळ आले असता स्वतंत्र लेन बंद असल्याने त्यांचे वाहन दुसऱ्या लेनला गेले. मात्र, तेथेही १५ ते २० मिनिटे होऊनही लेन खुली होत नसल्याने पोलीस अधीक्षकांनी याबाबत विचारणा करूनही काही कर्मचाऱ्यांनी गाडी जाऊ दिली नाही.

तसेच पोलीस अधीक्षकांशी हुज्जत घालत अरेरावी केली. त्यामुळे नाईलाजाने संतापून पोलीस अधीक्षक पाटील यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. पिंपळगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत संबंधित कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. पोलिस पोहचेपर्यंत पाटील यांचे शासकीय वाहन नाशिककडे रवाना झाले होते.

दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरा टोलवरील व्यवस्थापक (Manager) योगेश सिंग राजपूत, सहाय्यक व्यवस्थापक भगतसिंग देवरे, सिक्युरिटी सुपरवायझर प्रवीण जाधव, रामदास गवाने, संपत कडाळे, अनिल शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या