Wednesday, April 24, 2024
Homeनगरसिंगल फेज विद्युत पुरवठ्यासाठी पवार यांचा उपोषणाचा इशारा

सिंगल फेज विद्युत पुरवठ्यासाठी पवार यांचा उपोषणाचा इशारा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राहुरी तालुक्यातील केसापूर येथे सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास काँग्रेस (आय) पक्षातर्फे बेलापूर येथील महावितरण कार्यालयासमोर कोणतीही पूर्वसूचना न देता उपोषण करण्यात येईल. जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व केसापूरचे माजी सरपंच दीपक धोंडीराम पवार यांनी दिला आहे.

- Advertisement -

केसापूर येथे बेलापूर फिडरमधून सिंगल फेज विद्युतपुरवठा होतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून कधी रात्रीला तर कधी दिवसा विद्युतपुरवठा बंद केला आहे. दिवसा कडक ऊन व रात्रीच्या उकाड्यामुळे नागरिकांचे व वयोवृद्ध तसेच लहान बालकांचे हाल होत असून जीव मेटाकुटीला येत आहे.

विद्युतपुरवठा त्वरित सुरळीत न झाल्यास काँग्रेस पक्षातर्फे बेलापूर येथील महावितरण कार्यालयासमोर कोणतीही पूर्वसूचना न देता उपोषण करण्यात येईल. उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण विभागाची राहील. असे निवेदन पवार यांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या