Wednesday, April 24, 2024
Homeनगरदोघांवर विळ्याने प्राणघातक हल्ला

दोघांवर विळ्याने प्राणघातक हल्ला

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

मोटारसायकलवरून जात असताना कट मारल्याचा जाब विचारला म्हणून दोघा जणांवर धारदार विळ्याने प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुहा परिसरात घडली आहे.

- Advertisement -

23 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेदरम्यान विकास धोंडीराम सौदागर व त्याचा चुलतभाऊ रमेश अशोक सौदागर हे दोघेजण त्यांच्या मोटरसायकलवरून किराणा सामान आणण्यासाठी गुहा येथील बसस्थानकापासून जात होते. त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे त्याच्या मोटारसायकलवर जोरात आला आणि त्याने विकास सौदागर यांच्या मोटरसायकलला कट मारला. त्यावेळी विकास सौदागर याने ‘कट का मारला?’ असे विचारल्याचा राग आल्याने त्याने विकास सौदागर याला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

रमेश सौदागर हा भांडण सोडविण्यासाठी आला असता आरोपीने तुम्ही माझ्या नादी लागता काय? आज तुम्हाला कायमचा संपवून टाकतो, असे म्हणून धारदार दातरे असलेल्या विळ्याने रमेश सौदागर याच्यावर हल्ला केला. त्याच्यावर विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. त्याचबरोबर विकास सौदागर याच्यावर देखील वार करून दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

विकास धोंडीराम सौदागर (वय 24) रा. गुहा ता. राहुरी याच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय विजय शिंदे याच्या विरोधात गुन्हा रजि. नं. 1017/2022 भादंवि कलम 307, 324, 323, 504, 506 प्रमाणे शिवीगाळ, मारहाण, धमकी व जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत विकास धोंडीराम सौदागर व रमेश अशोक सौदागर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी फॅक्टरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या