अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
महावितरण कंपनीकडून आज (शनिवार) सायंकाळपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत नगर शहर पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीचे काम महापालिका करणार आहे. परिणामी शहर आणि उपनगरांच्या पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. शहरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा होईल.
बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच सारसनगर, बुरुडगावरोड, केडगाव, अहमदनगर – कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसराला शनिवार ऐवजी रविवारी पाणीपुरवठा होईल. तर मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागात तसेच गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हाडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हाडको, स्टेशन रोड, विनायकनगर या भागाला रविवार ऐवजी सोमवारी पाणीपुरवठा होणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भाग सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्ली दरवाजा, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापडबाजार परिसर, ख्रिस्तगल्ली भागाला सोमवार ऐवजी मंगळवारी पाणीपुरवठा केला जाणार आहे.