Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपूरची ‘सोने चोर’ टोळी राजूरमध्ये गजाआड

श्रीरामपूरची ‘सोने चोर’ टोळी राजूरमध्ये गजाआड

राजूर |वार्ताहर| Rajur

अकोले तालुक्यातील राजूर येथे बस स्टँड परिसरात सोने चोरी करणार्‍या श्रीरामपूर येथील गुन्हेगारांच्या सराईत टोळीस

- Advertisement -

राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून हजारो रुपयांचा नेकलेस हार हस्तगत केला आहे.

साहिल नाशिक खान राहणार श्रीरामपूर, अर्जूंन कानिफनाथ भोसले, राहणार अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर, कमलेश उत्तम पवार, राहणार अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर, गुफरान निसार पठाण, राहणार सोमेश्वर पथ श्रीरामपूर या चौघांना राजूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असता यापूर्वीही त्यांनी राजूर परिसरात असे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

आरोपींना मुद्देमालासह राजूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तसेच पुढील तपास चालू आहे. या कामगिरीनंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, पोलीस उपाधीक्षक राहुल मदने यांनी राजूर पोलिसांचे कौतुक केले आहे.

दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी राजूर शहरातील सौ. कुसुम लक्ष्मण नाडेकर (राहणार शाळेजवळ) यांचे राजूर बस स्टॅन्ड येथे राजूर ते कोहणे या बसमध्ये बसताना कोणीतरी अज्ञान इसमांनी सौ. कुसुम नाडेकर यांची पर्समधून 96 हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस 16 ग्रॅम 960 मिली असलेला चोरून घेऊन गेले.

त्याबाबतचा कुसुम नाडेकर यांना कळताच त्यांनी लगेच राजूर पोलीस स्टेशन येथे जाऊन गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार तसेच पोलीस कर्मचारी हे त्यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे मदतीने तपास करत असताना पाटील यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की या गुन्हा बाबत श्रीरामपूर येथील सराईत टोळीचा हात असू शकतो.

अशी गोपनीय माहिती मिळताच पथकातील पोलिस उपनिरीक्षक नितीन खैरनार, पो.हे.कॉ.आघाव, पो.कॉ.फटांगरे,पो.कॉ.गाढे,पो. कॉ.वाडेकर व अकोले पोलिस स्टेशन चे पो.कॉ.मैड या सर्वांनी मिळून अकोले बस स्टँड वर जाऊन मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या