Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात 28 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

श्रीरामपूर तालुक्यात 28 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

करोनावर नियंत्रण आणण्यासाठी तसेच त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 28 मार्च ते 2 एप्रिल 2021 या कालावधीत कोणत्याही सार्वजनिक

- Advertisement -

स्वरूपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटनेने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर साथरोग अधिनियमाखाली दंडनीय अथवा कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तहससीलदार प्रशांत पाटील यांना दिले आहेत.

राज्य शासनाने राज्यात करोनाच्या पार्श्वभूमिवर निबर्ंध शिथील व टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उघडण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबत आदेशीत केले आहे. जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्याक्रमांत एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच राज्यात कोव्हिड 19 चा प्रादुर्भाव अद्यापही असल्याने होळी, धुलिवंदन व रंगपंचमीचा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कारोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देण्यासाठी जिल्ह्यात होळी, धुलिवंदन व रंगपंचमी हे उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजानिक व खाजगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात करोना विषाणूवर उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे दिनांक 28 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत कोणत्याही सार्वजनिक स्वरूपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली असून कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशिर कारवाई केली जाईल, असा इशारा तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिला आहे.

श्रीरामपूर तालुक्यात करोनाचे 69 रुग्ण

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात काल करोनाचे नवीन 69 रुग्ण सापडले आहेत. तर 325 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालयात 14, खासगी रुग्णालयात 51 तर अ‍ॅन्टीजेन तपासणीत 04 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 23 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 325 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत सुमारे 561 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. त्यातील 236 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 325 रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

दरम्यान काल तहसीलदार प्रशांत पाटील यांनी तालुक्यातील गावांमध्ये आठवडे बाजारासह सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध घालण्याचे आदेश दिले आहेत. सर्व नागरिकांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाशी मुकाबला करण्यासाठी नियमाचे पालन करावे. सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळावे, गर्दी करू नये, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच मास्कचा वापर कायम करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

श्रीरामपूर शहरात दर शुक्रवारी भरला जाणारा आठवडे बाजार आजही सुरू राहणार असून यासाठी सर्व भाजीपाला विक्रेत्यांनी सोशल ड्स्टिन्सचे पालन करावे, मास्कचा वापर करावा तसेच जास्त गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच बाजारात जास्त गर्दी हेाणार नाही म्हणून पालिकेच्यावतीने खबरदारी घेतली जाणार आहे.

– गणेश शिंदे, मुख्याधिकारी श्रीरामपूर नगरपालिका

- Advertisment -

ताज्या बातम्या