Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीगोंदा पोलीसांची अवैध वाळू प्रकरणी कारवाई

श्रीगोंदा पोलीसांची अवैध वाळू प्रकरणी कारवाई

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा पोलिसांनी सीना नदी पात्रात अवैध वाळू चोरणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई करत ट्रॅक्टरसह पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध वाळू चोरी होत असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळाली होती. त्यानुसार तरड गव्हाण येथे सिना नदीचे पात्रातून एक व्यक्ती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये विना परवाना बेकायदा बाळू भरून चोरी करीत आहे.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी लगेच पोलीस कॉन्स्टेबल प्रताप तानाजी देवकाते, पो.कॉ टाके , पो.कॉ साठे या पथकातील कर्मचार्‍यांना सदर ठिकाणी जाऊन कारवाई करण्यास पाठवले. पोलीस व पंच असे नदी पात्राकडे जात असताना ट्रॅक्टर चालक याने ट्रॅक्टर व ट्रॉली सोडून पळून गेला. सदर ट्रॅक्टर चालक व मालक यांचे विरुध्द भा.दं.वि कलम 379.511 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री नवले करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या