Friday, April 26, 2024
Homeनाशिकश्रीराम, गरुड रथोत्सव मार्गाची पोलिसांकडून पाहणी

श्रीराम, गरुड रथोत्सव मार्गाची पोलिसांकडून पाहणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रामनवमीनंतर (Ramnavami) येणाऱ्या कामदा एकादशीला श्रीरामरथ व गरुडरथची पंचवटी परिसरातून भव्य मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दोन एप्रिल रोजी हा सण साजरी होणार असला तरी आज पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांच्या आदेशानुसार पोलीस अधिकाऱ्यांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांनी संपूर्ण मार्गाची व परिसराची पाहणी केली….

- Advertisement -

पोलीस (Police) दलासह स्मार्टसिटी, महापालिका, विदयुत विभाग, दुरसंचार विभागाचे अधिकारी व श्री काळाराम मंदिराचे (Kalaram Temple) विश्वस्त तसेच रथोत्सव पदाधिकाऱ्यांसमवेत आज (दि.27) सकाळी रथोत्सव मार्गाची संयुक्त पाहणी करण्यात आली.

श्रीकाळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून रथोत्सव मार्गाच्या पाहणी दौऱ्याला पायी सुरुवात करण्यात आली. श्रीरामरथ व गरूडरथ ज्या मार्गाने जातात, त्या नागचौक, काट्या मारूती चौक, गणेशवाडी, गाडगे महाराज पुलाखालील भाग, नेहरू चौक, रोकडोबा तालीम, म्हसोबा पटांगण, गौरीपटांगण, सरकारवाडा, भांडीबाजार, कपुरतळा मैदान, कपालेश्वर येथील रस्त्याची पाहणी केली.

तसेच श्रीरामस्थ व गरूडरथ यांची देखील पाहणी केली व श्रीकाळाराम मंदिराचे विश्वस्त यांच्याकडून मिरवणुकीदरम्यान येणारे रस्त्यावरील अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित असलेले स्मार्टसिटी, मनपा, विदयुत विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना विशेषतः श्रीरामरथ व गरुडरथ मिरवणूक मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण, कॉक्रीटीकरणाची कामे करून घेणे, अनावश्यक खडी, कच उचलुन घेणे, उतार सुलभ करणे आदी बाबींची पुर्तता करण्यासाठी स्मार्टसिटी व मनपा विभागाचे अधिकारी यांना सुचना करण्यात आली.

“तोंडाच्या वाफा काढू नका, हिंमत असेल तर…”; बावनकुळेंच ठाकरेंना ओपन चॅलेंज

यावेळी पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहा. आयुक्त डॉ. सिध्देश्वर धुमाळ, गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्यासह नरेंद्र शिंदे (मनपा विभागीय अधिकारी, पंचवटी), किसन कानडे (डेप्युटी जनरल मॅनेजर, स्मार्टसिटी), प्रदिप दाळु, (अति. कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग) तसेच श्रीकाळाराम मंदिर विश्वस्त आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का? CM शिंदेंचा ठाकरेंना सवाल

‘या’ दिल्या सूचना

विद्युत तारा खाली आल्या असून त्या श्रीरामस्थ व गरुडरथ यांना अडथळा निर्माण करू शकतात. त्यामुळे तारा उंच कराव्यात, मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण हटविणे, अनधिकृत बॅनरर्स (होर्डिंग्ज) काढणे, मिरवणूक मार्गावरील धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. ही सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण व्हावीत, असे यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या