Thursday, April 25, 2024
Homeनाशिककामे मार्गी लावण्यास कमी कालावधीच्या निविदा

कामे मार्गी लावण्यास कमी कालावधीच्या निविदा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद Zilla Parishad सदस्यांचा कार्यकाळ अवघ्या दोन-तीन महिन्यांचा राहिला आहे. याकाळात विद्यमान सदस्यांनी आपापल्या गटात विविध कामे करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर एक कोटींच्या आतील कामांसाठी कमी कालावधीच्या निविदा प्रक्रिया Short term tenders राबवण्याचा निर्णय जि.प.च्या बांधकाम समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती बांधकाम सभापती तथा उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी दिली.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची मासिक बैठक डॉ. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला समिती सदस्य उदय जाधव, सिद्धार्थ वनारसे, अशोक टोंगारे, लता बच्छाव, सिमंतीनी कोकाटे, रूपांजली माळेकर आदी उपस्थित होते.

बांधकाम समितीअंतर्गत नियोजन पूर्ण झालेले असल्याने कामे वेळेत करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर ग्रामविकास विभागाने कामे लवकर व्हावी, यासाठी मार्चमध्ये परवानगी दिलेल्या कमी कालावधीच्या निविदांची मुदत वाढवत 31 ऑक्टोबर केलेली आहे. यामुळे याआधी 10 लाखांवरील सर्व कामांची निविदा प्रक्रिया 31 ऑक्टोबरच्या आत पूर्ण करण्याचा निर्णय यावेळी झाला. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी, अशा सूचना डॉ. गायकवाड यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.

अध्यक्षांचे अधिकार्‍यांना निर्देश

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांची बैठक उपाध्यक्ष डॉ. गायकवाड यांनी समितीच्या बैठकीनंतर अध्यक्षांच्या दालनात घेतली. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी कार्यकारी अभियंता संजय नारखेडे व सुरेंद्र कंकरेज यांच्याकडून निविदा प्रक्रिया राबवता येऊ शकेल, अशा कामांची माहिती घेतली. या दोन्ही कार्यकारी अभियंत्यांनी या सर्व कामांना तांत्रिक मान्यता देण्याचे काम सुरू असून दोन दिवसांमध्ये ते पूर्ण होईल. त्यानंतर अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनीही बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना 29 ऑक्टोबरपर्यंत सर्व निविदा प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या