धक्कातंत्र : जळगाव मनपात होणार शिवसेनेची कोंडी

jalgaon-digital
3 Min Read

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

महापालिकेतील (Municipal Corporation) बंडखोर सहा नगरसेवक (Rebel six corporators) भाजपमध्ये (BJP) परतीच्या मार्गावर (On the way back) असून त्यांनी शनिवारी भाजपनेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांची भेट (meeting) घेऊन आपण भाजपला पाठिंबा देणार (Will support BJP) असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महापालिकेत शिवसेना अल्पमतात (Shiv Sena is in minority) येणार असून महापौर, उपमहापौर शिवसेनेचे असले तरी, भाजपाकडून शिवसेनेची कोंडी (Shiv Sena’s dilemma) केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जळगाव महानगरपालिकेत निवडून आलेल्या भाजपच्या 57 नगरसेवकांपैकी 27 नगरसेवक फोडून शिवसेनेने सत्ता काबिज केली होती. त्यानंतर पुन्हा 6 बंडखोर नगरसेवकांनी भाजपमध्ये घरवापसी केली होती. त्यामुळे शिवसेना सभागृहात अल्पमतात आली होती. त्यानंतर सभागृह नेते ललित कोल्हे यांनी पुन्हा तीन नगरसेवकांना शिवसेनेत दाखल केल्यामुळे शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. मात्र, आता पुन्हा 6 नगरसेवकांनी ना.गिरीश महाजन यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाजपकडे आधी परतलेले 6 व आता परतीच्या मार्गांवर असलेले 6 आणि मुळ भाजपचे 30 असे एकूण 42 नगरसेवकांचे संख्याबळ भाजपकडे झाले आहे. तर शिवसेनेकडे एमआयएमचे 3, शिवसेनेचे 15 व बंडखोर गटाचे 15 असे एकूण 33 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनेला कोणताही ठराव करावयाचा असेल तर भाजपशी जुळवून घ्यावे लागणार आहे; अन्यथा शिवसेनेची कोंडी भाजपाकडून होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाजपला देणार सहा नगरसेवक पाठिंबा

महानगरपालिकेत 27 नगरसेवकांनी बंडखोरी करुन सेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर प्रतिभा पाटील, रुकसानाबी गबलू खान, दत्तात्रय कोळी, कांचन सोनवणे, रंजना सपकाळे, मीनाक्षी पाटील यांनी भाजपमध्ये घरवापसी केली होती. त्यानंतर आता नवनाथ दारकुंडे, अ‍ॅड. दिलीप पोकळे, प्रतिभा देशमुख, चेतन सनकत, रेश्मा काळे, ज्योती चव्हाण हे शिंदे गटात सामिल झाले असून आता भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली. तसेच ललित कोल्हे यांचा गट देखील भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

परतीच्या मार्गांवरील नगरसेवकांना भाजपमधून विरोध

भाजपला धक्का देवून गेलेल्या नगरसेवकांपैकी काही नगरसेवक परतीच्या मार्गांवर आहेत. मात्र, या नगरसेवकांना पुन्हा भाजपमध्ये घेऊ नये, अशी भूमिका भाजपमधील काही पदाधिकार्‍यांसह नगरसेवकांनी घेतली आहे. तसेच त्याच्यावरील अपात्रतेच्या कारवाई लवकर व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, बंडखोरांना परत घ्यावे किंवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय भाजपा नेते ना.गिरीश महाजन घेतील,असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *