Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या लेखामुळे महाविकास आघाडीत खळबळ, पवार म्हणाले...

संजय राऊतांच्या लेखामुळे महाविकास आघाडीत खळबळ, पवार म्हणाले…

मुंबई

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. हे प्रकरण थांबयला तयार नाही. आतात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या लेखामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली.

- Advertisement -

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून राज्यातील राजकीय घडामोडींवर विस्तृत भाष्य केले आहे. गृहमंत्री पदाबाबत गौप्यस्फोट करताना लिहिलेले आहे की “पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल. देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे. दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?,”

संजय राऊत यांच्या या लेखानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली. या लेखावर राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. बारामतीत पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, “राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे शिवसेनेत कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा निर्णय उद्धव ठाकरे घेत असतात. काँग्रेसमध्ये सुद्धा कुणाला मंत्रिपद द्यायचे याचा अधिकार हा सोनिया गांधी यांना आहे आणि राष्ट्रवादीमध्ये १९९९ पासून मधली ५ वर्ष वगळता सरकारमध्ये काम करत आहोत. पवार साहेबांना ५०वर्षांचा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे कुणाला मंत्रिपद द्यायचे, कुणाला कोणता विभाग द्यायचा, हे राष्ट्रवादीमध्ये तेच ठरवत असतात. इतरांनी वक्तव्य केले तर समजू शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असताना मान्यवरांनी एकमेकांना अडचणीत आणण्याचे वक्तव्य करू नये,”

- Advertisment -

ताज्या बातम्या